नवी दिल्ली, 26 जानेवारी : प्रजासत्ताक दिनी शेतकऱ्यांनी काढलेल्या ट्रॅक्टर रॅलीदरम्यान मोठ्या प्रमाणात हिंसक घटना समोर आल्या आहे. यामध्ये सार्वजनिक ठिकाणी तोडफोड केल्याच्या बातम्याही समोर आल्या आहेत. दिल्लीत झालेल्या हिंसाचारात आतापर्यंत 83 जवान जखमी झाले आहेत, अशी माहिती दिल्ली पोलिसांनी दिली आहे. याशिवाय 41 पोलीस कर्मचारी जखमी झाले आहे.
दिल्ली पोलिसातील सीनियर पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार दिल्लीत झालेल्या हिंसाचारात जिल्ह्यांनुसार खटले दाखल करण्यात येईल. सरकारी कामात अडथळा आणणे, पोलीस कर्मचाऱ्यांवर हल्ला, सरकारी संपत्तीचं नुकसान आणि कोरोना गाइडलाइन्सचं उल्लंघन करणे आणि NOC च्या नियमांची अवहेलना करणे आदी गुन्ह्यांच्या आधारावर गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. याशिवाय नुकसान पोहोचविणाऱ्यांची ओळख पटवून त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येणार आहे. याबाबत अमित शहा प्लान तयार करत असल्याचंही सांगण्यात येत आहे.
हे ही वाचा-Tractor Ralley: शेतकरी आंदोलनाला लागलं हिंसक वळण, पाहा दिवसभरातली क्षणचित्रं
अमित शहांनी बोलावली बैठक
दिल्लीतील बिघडत चाललेली परिस्थिती पाहता केंद्रीय गृह मंत्री अमित शहा यांनी मंगळवारी सायंकाळी 5 वाजता आपात्कालीन बैठक बोलावली. या बैठकीत दिल्ली पोलीस, इंटेलिजन्स आणि गृह मंत्रालयातील अधिकारी उपस्थित होते. गृह मंत्रालयाचे सचिव अजय भल्ला यांनी शहा यांनी दिल्लीतील परिस्थिती सांगितली. भल्ला यांनी त्यांना कृषी कायद्याविरोधात शेतकऱ्यांनी ट्रॅक्टर रॅली कधी आणि कशी हिंसक झाली याची सविस्तर माहिती दिली.
लहान मुलं आणि कलाकारांची सुटका
दिल्लीच्या लाल किल्ल्याजवळ रिपब्लिक डे कार्यक्रमासाठी तब्बल 225 हून अधिक लहान मुलं आणि कलाकार किसान रॅलीमुळे अडकले होते. ज्यानंतर त्यांनी दरियागंजमधील एका मेसमध्ये सुरक्षित ठिकाणी ठेवण्यात आलं. त्यानंतर दिल्ली पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन धौलाकुआच्या दिशेने पाठवलं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Amit Shah, Delhi, Farmer, Farmer protest