मराठी बातम्या /बातम्या /देश /

बाल पुरस्कार : महाराष्ट्राने मारली बाजी, PM मोदी सोमवारी साधणार संवाद

बाल पुरस्कार : महाराष्ट्राने मारली बाजी, PM मोदी सोमवारी साधणार संवाद

केंद्र सरकार विविध क्षेत्रात अपवादात्मक क्षमता आणि उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या मुलांना हे पुरस्कार प्रदान करते.

केंद्र सरकार विविध क्षेत्रात अपवादात्मक क्षमता आणि उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या मुलांना हे पुरस्कार प्रदान करते.

केंद्र सरकार विविध क्षेत्रात अपवादात्मक क्षमता आणि उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या मुलांना हे पुरस्कार प्रदान करते.

नवी दिल्ली, 24 जानेवारी : देशातील 32 बालकांना रविवारी प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार-2021 प्रदान करण्यात आले. केंद्र सरकार नवनिर्माण, शैक्षणिक यश, क्रीडा, कला आणि संस्कृती ,समाज सेवा, आणि शौर्य या क्षेत्रात अपवादात्मक क्षमता आणि उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या मुलांना हे पुरस्कार प्रदान करते. विशेष म्हणजे महाराष्ट्राला यंदा सर्वाधिक पाच पुरस्कार मिळाले आहेत. पुरस्कारार्थी बालकांत 21 राज्ये,केंद्रशासित प्रदेशातील 32 जिल्ह्यांतील मुलांचा समावेश आहे. 7 पुरस्कार कला आणि संस्कृती क्षेत्रातील बालकांना, 9 पुरस्कार नवनिर्मिती क्षेत्रातील बालकांना, 5 बालकांना शैक्षणिक क्षेत्रातील कामगिरी बद्दल पुरस्कार देण्यात आले आहेत. 7 बालकांना क्रीडा क्षेत्रात,3 बालकांना शौर्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आले असून एका बालकाला त्याच्या समाजसेवेच्या क्षेत्रातील प्रयत्नांसाठी सन्मानित करण्यात आले आहे. 'मला आशा आहे की प्रधानमंत्री बाल पुरस्कार -2021 केवळ विजेत्यांनाच प्रेरणा देईल असे नव्हे तर इतर कोट्यवधी मुलांना स्वप्ने पहायला आकांक्षांनी प्रेरित व्हायला, तसेच आपल्या मर्यादा वाढवायला प्रेरणा देतील. आपण सर्व जण आपल्यातील सर्वोत्तमाने देशाला यशाच्या नव्या शिखरावर आणि समृध्दीकडे नेण्यासाठी प्रयत्नशील राहू या,' असे मत यश संपादन करणाऱ्या बालकांचे कौतुक करताना राष्ट्रपतींनी आपल्या संदेशात व्यक्त केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या या सर्व पुरस्कारार्थी बालकांशी व्हिडिओ काँन्फरन्सद्वारे संवाद साधणार आहेत. महाराष्ट्रातील या बालकांना मिळाला पुरस्कार : 1) कामेश्वर जगन्नाथ वाघमारे (शौर्य पुरस्कार) 2) श्रीनाभ मौजेश अग्रवाल (नवनिर्माण पुरस्कार) 3)अर्चित राहुल पाटील (नवनिर्माण पुरस्कार) 4) सोनीत सीसोलेकर (शैक्षणिक पुरस्कार) 5) काम्या कार्तिकेयन (क्रीडा पुरस्कार)
First published:

Tags: PM narendra modi

पुढील बातम्या