दररोज लागणाऱ्या 21 औषधांच्या किंमती 50 टक्क्यांनी महागणार!

दररोज लागणाऱ्या 21 औषधांच्या किंमती 50 टक्क्यांनी महागणार!

कच्च्या मालांमध्ये झालेली वाढ, चीनमधून आयात होणाऱ्या औषधांच्या किंमतीमध्येही वाढ झाल्याने औषधांच्या किंमती वाढविणं गरजेचं होतं असं या औषध निर्मात्या कंपन्यांचं मत होतं.

  • Share this:

नवी दिल्ली 16 डिसेंबर : अर्थव्यवस्थेत आलेली सुस्ती आणि काही प्रमाणा वाढलेले महागाई यामुळे सामान्य नागरिकांच्या खिशाला कात्री लागलेली आहे. अर्थव्यवस्थेच्या विकासाचा वेग घसरल्याने बाजारातल्या पैशांचा ओघ आटलेला आहे. अशी परिस्थिती असताना केंद्र सरकारच्या आणखी एका निर्णयामुळे सामान्यांच्या खिशाला कात्री बसण्याची शक्यता आहे. केंद्र सरकार (Central Government) ने 21 Life Saving Medicines (21 जीवनावश्यक) औषधांच्या किंमतीत 50 टक्क्यांची वाढ करण्याचा निर्णय घेतलाय. यात काही अँटीबायोटिक्स (Antibiotic), एस्कॉर्बिक एसिड (व्हिटॅमिन सी च्या गोळ्या) आणि सीरपचा समावेश आहे. त्याचबोरबर बीसीजी वॅक्सिन, कुष्ठ रोग आणि मलेरियासाठी घेण्यात येणाऱ्या औषधांचाही समावेश आहे.

CAA PROTEST : 'हिंसाचार थांबवा नंतर सुनावणी करू', सर्वोच्च न्यायालयाने फटकारले

केंद्र सरकारची संस्था असलेल्या NPPAने Drugs Price Control Order 2013मध्ये दुरुस्ती करून या किंमती वाढवल्या आहेत. आत्तापर्यंत या कायद्याचा वापर हा किंमती कमी करण्यासाठीच केला जात होता. गेल्या दोन वर्षांपासून औषध निर्मात्या Active Pharmaceutical Components (API) कंपन्या या औषधांच्या किंमती वाढविण्याची मागणी करत होत्या.

कच्च्या मालांमध्ये झालेली वाढ, चीनमधून आयात होणाऱ्या औषधांच्या किंमतीमध्येही वाढ झाल्याने औषधांच्या किंमती वाढविणं गरजेचं होतं असं या औषध निर्मात्या कंपन्यांचं मत होतं. गेल्या काही वर्षात सरकारने औषधांच्या किंमतींवर नियंत्रण ठेवलं होतं. त्याचबोरबर ह्रदयविकाराशी संबंधीत औषधांच्या किंमती मोठ्या प्रमाणावर कमीही केल्या होता.

राहुल गांधींच्या अडचणी वाढणार? केंद्रीय निवडणूक आयोगाकडून हालचाली

किंमती कमी झाल्याने औषध निर्मात्या कंपन्यांवर मोठा दबाव निर्माण झाला होता. कच्चा माल जास्त किंमतीमध्ये घ्यावा लागत असल्याने त्यांना तोटा सहन करावा लागत होता. त्यामुळे मंदीच्या काळात याचा मोठा फटका त्यांना बसला. सरकारला मात्र कंपन्यांची चिंता आणि ग्राहक या दोघांचाही विचार करावा लागत असल्याने किंमती वाढविण्यात येत नव्हत्या.

 

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: medicines
First Published: Dec 16, 2019 02:38 PM IST

ताज्या बातम्या