नवी दिल्ली, 30 ऑगस्ट : जागतिक मंदीचा परिणाम भारताच्या अर्थव्यवस्थेवर दिसू लागला आहे. GDP म्हणजेच सकल राष्ट्रीय उत्पन्नात चांगलीच घसरण झाली आहे. एप्रिल ते जून या तिमाहीमध्ये GDP मध्ये ही घसरण पाहायला मिळाली. मागच्य वर्षी याच तिमाहीमध्ये GDP 8 टक्के होता. तो आता 5 टक्क्यांवऱ आला आहे.
देशाला आर्थिक मंदीतून बाहेर काढण्यासाठी मोदी सरकारने एक विशेष योजना तयार केली आहे. या आराखड्यामुळे उद्योगांना प्रोत्साहन मिळेल.यामध्ये सरकारने उद्योगांसाठी कर सवलत, अनुदान अशा योजना आणल्या आहेत. उद्योगांवरचा आर्थिक भार कमी करण्याचा या योजनेचा उद्देश आहे. त्याचबरोबर भारतात उद्योग करणं उद्योजकांसाठी सोपं व्हावं यासाठीही सरकारने एक प्लॅन बनवला आहे.
सरकारने महसूल विभागाला सोबत घेऊन एक आराखडा बनवला आहे. जे लोक प्रामाणिकपणे कर भरतात अशा लोकांना त्रास दिला जाणार नाही, ज्या करदात्यांनी किरकोळ चुका केल्या असतील त्यांनाही हैराण केलं जाणार नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी इकॉनॉमिक टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत हे जाहीर केलं होतं.
एअर इंडियामध्ये नोकरीच्या संधी, या पदांसाठी करू शकता अर्ज
भारतीय औद्योगिक क्षेत्रात मागणी घटल्याबदद्ल चिंता व्यक्त होते आहे. ग्राहकांच्या हाती जास्त पैसे असले तर मागणी वाढेल आणि मालाची विक्रीही होईल. त्यामुळेच अप्रत्यक्ष दरात कपात करण्याचाही सरकारचा विचार आहे
यासोबतच निर्मला सीतारामन यांनी कारउद्योगासाठीही काही घोषणा केल्या आहेत. कारउद्योगावर जीएसटी कमी करण्याची मागणी होते आहे. या पॅकेजमध्ये या मागणीवरही विचार होईल. जुलै महिन्यात गाड्यांच्या विक्रीत सुमारे 36 टक्क्यांची घट झाली आहे. त्यामुळेच कार उद्योगाला या संकटातून बाहेर काढण्याचा सरकारचा प्रयत्न आहे.
=====================================================================================================
भिडे गुरूजींनी पडल्या उदयनराजेंच्या पाया, पाहा हा VIDEO