मराठी बातम्या /बातम्या /देश /तबलिगी जमातच्या तपासात ED च्या हाती मोठी माहिती; मुंबईतील नेत्याचं हवाला कनेक्शन असल्याचा संशय

तबलिगी जमातच्या तपासात ED च्या हाती मोठी माहिती; मुंबईतील नेत्याचं हवाला कनेक्शन असल्याचा संशय

तबलिगी जमातशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने (ED) विविध ठिकाणी छापेमारी सुरू केली आहे.

तबलिगी जमातशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने (ED) विविध ठिकाणी छापेमारी सुरू केली आहे.

तबलिगी जमातशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने (ED) विविध ठिकाणी छापेमारी सुरू केली आहे.

नवी दिल्ली, 20 ऑगस्ट : केंद्रीय तपास एजंसी ED च्या टीमने 19 ऑगस्त रोजी देशातील 20 लोकेशन वर छापेमारी केली होती, या दरम्यान ED ला अनेक महत्त्वपूर्ण माहिती मिळाली. ED च्या टीमला राजधानी आणि मुंबईसंबंधित काही हवाला व्यवसाय आणि तबलिगी जमातशी संबंधित कनेक्शनबाबत माहिती मिळाली आहे.

या प्रकरणाचा जेव्हा अधिक तपास करण्यात आला तेव्हा मुंबईतील एका स्थानिक मोठ्या नेत्याचं आणि व्यावसायिकांचं हवाला कनेक्शन असल्याची माहिती समोर आलं आहे. आता या प्रकरणाचं गांभीर्य पाहता त्या सर्व कनेक्शनबाबत ईडीची टीम शोध घेत आहे. ED ची टीम लवकरच मुंबईशीसंबंधित तब्लिगी जमात - हवाला कनेक्शन असलेले व्यावसायिक आणि त्या स्थानीक नेत्यांमध्ये असलेल्या कनेक्शन प्रकरणात मोठा खुलासा करू  शकते.

तबलिगी जमातशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने (ED) विविध ठिकाणी छापेमारी सुरू केली आहे. यामध्ये मुंबईसह इतर काही भागांचा समावेश असल्याची माहिती आहे. मुंबईतील अंधेरी, SV रोड यासह एकूण 4 ठिकाणी ईडीकडून छापे टाकण्यात येत आहेत.

तबलिगी जमातचा प्रमुख मौलाना साद याच्याविरोधात 17 एप्रिल रोजी पैशाच्या अफरातफर प्रकरणी ईडीने गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर आता याप्रकरणी कारवाईला वेग आला असून मुंबतही छापेमारी करण्यात येत आहे. कोरोनाचा भारतात शिरकाव झाल्यानंतर तबलिगी जमात चर्चेत आली होती. दिल्लीत धार्मिक कार्यक्रमाचं आयोजन केल्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढवल्याचा आरोप या संघटनेवर करण्यात आला. या कार्यक्रमात नियमांचं उल्लंघन करणाऱ्या आणि कोरोनाचा फैलाव करणाऱ्या दिल्लीमधील निजामुद्दीन मर्कझचे प्रमुख मौलाना साद यांच्याविरोधात पोलिसांनी एफआयआर दाखल केला होता. पोलिसांनी एफआयआर दाखल केल्यानंतर मौलाना साद फरार झाले होते.

First published:
top videos

    Tags: Corona virus in india