Air India ने प्रवास केल्यास ज्येष्ठ व्यक्तींना मोठी सूट; वाचा कसं मिळेल 50% डिस्काऊंट

Air India ने प्रवास केल्यास ज्येष्ठ व्यक्तींना मोठी सूट; वाचा कसं मिळेल 50% डिस्काऊंट

देशातील सरकारी एयरलाईन्स कंपनी एअर इंडिया (Air India) ने ज्येष्ठांसाठी नवी योजना सुरू केली आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 16 डिसेंबर : देशातील सरकारी एयरलाईन्स कंपनी एअर इंडिया (Air India) ने सी‍नियर सिटीजन्सना म्हणजेच ज्येष्ठांना आकर्षित करण्यासाठी नवी स्कीम सुरू केली आहे. स्कीमअंतर्गत कोणी सीनियर सिटीजन (Senior Citizens) एअर इंडियाच्या फ्लाईनमधून प्रवास करतील तर त्यांना बेसिक फेअरमध्ये (Basic Fare) 50 टक्के सवलत मिळेल. एव्हीएशन मिनिस्ट्री (Ministry of Civil Aviation) ने सांगितलं की, एअर इंडियाची ही स्कीम देशातील सर्व मार्गावर लागू होईल. मात्र यासाठी सीनिअर सिटीजन्सना किमान 3 दिवसांपूर्वी तिकीट बुक करावे लागेल.

ज्येष्ठांनी प्रवास करताना ही कागदपत्र अवश्य बाळगावी

एव्हिएशन मिनिस्ट्रीनुसार जेव्हा ज्येष्ठ मंडी एअर इंडियाच्या फ्लाइटने प्रवास करतील तेव्हा त्यांच्याजवळ काही आवश्यक कागदपत्र असणं गरजेचं आहे. यामध्ये ओळख पटण्यासाठी प्रवाशाकडे जन्मदिनांक, फोटो असलेले ओळखपत्र सामील आहे. मिनिस्ट्रीने म्हटले की जर प्रवाशाकडे ओळखपत्र नसेल तर त्याला तिकिटात सूट दिली जाणार नाही. अशा परिस्थितीत ज्येष्ठ नागरिक प्रवाशाला पूर्ण भाडे द्यावे लागेल.

एअर इंडियाच्या अधिकृत साइटनुसार, एखादं मूल ज्येष्ठ नागरिक प्रवाशाला घेऊन प्रवास करत असेल तर त्या प्रवाशाला तिकिटासाठी संपूर्ण भाडे द्यावे लागेल. त्याच वेळी, आपण एअर इंडिया सवलतीच्या सर्व नियम http://www.airindia.in/senior-citizen-concession.htm या वेबसाईटवर पाहू शकता.

ज्येष्ठ नागरिकांना केवळ भारतातील उड्डाणांवर सूट

एअर इंडियाच्या म्हणण्यानुसार 60 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या प्रवाशांना भारतांर्गत उड्डाणे उपलब्ध आहेत. त्याचबरोबर या सवलतीचा फायदा फक्त इकॉनॉमी क्लासच्या तिकिट बुकिंगवर उपलब्ध होईल. या प्रकरणात ज्येष्ठ नागरिकांनी तिकिट बुक केल्यास त्यांना मूळ भाड्याचे 50 टक्के पैसे द्यावे लागतील. ही ऑफर तिकीट देण्याच्या तारखेपासून एक वर्षासाठी लागू असेल.

Published by: Meenal Gangurde
First published: December 16, 2020, 9:22 PM IST
Tags: air india

ताज्या बातम्या