मोठा खुलासा! अभिनंदची हत्या करणार होतं पाकिस्तान, असा रचला कट

पाकिस्तानच्या एफ-16 लढाऊ विमानाचा पाठलाग करतानाच अभिनंदन वर्धमान यांचं मिग-21 विमान चुकून पाकिस्तानच्या हद्दीत शिरलं होतं. यानंतरही अभिनंदन हे सुरक्षित भारतात परत येऊ शकत होते. पण...!

News18 Lokmat | Updated On: Aug 14, 2019 07:25 PM IST

मोठा खुलासा! अभिनंदची हत्या करणार होतं पाकिस्तान, असा रचला कट

नवी दिल्ली, 14 ऑगस्ट : एअरस्ट्राईक कारवाईनंतर भारतीय हद्दीत बिथरलेल्या पाकिस्तानच्या एफ-16 लढाऊ विमान घुसखोरी केली होती. यावेळेस हवाईदलाच्या मिग-21 बायसन विमानानं पाकिस्तानचं एफ-16 विमान पाडलं. पाकिस्तानच्या एफ-16 लढाऊ विमानाचा पाठलाग करतानाच अभिनंदन वर्धमान यांचं मिग-21 विमान चुकून पाकिस्तानच्या हद्दीत शिरलं होतं. यानंतरही अभिनंदन हे सुरक्षित भारतात परत येऊ शकत होते. पण पाकिस्तानच्या कारस्थानामुळे त्यांना ते शक्य झालं नाही.

आपल्या हद्दीमध्ये शिरल्यानंतर पाकिस्तान आपल्या भारतीय सैनिकाला मारण्याच्या तयारीत होता. पण त्यांना जमलं नाही. अभिनंदन हे पाकच्या हद्दीत शिरताच त्यांना परत येण्याची सूचना देण्यात आली होती. पण पाकिस्तानकडून त्यांच्या कम्युनिकेशन सिस्टमलाच जाम करण्यात आलं होतं. त्यामुळे वॉर रुममधून आलेल्या सूचना अभिनंदन यांना ऐकू गेल्या नाही आणि त्यांना पाकिस्तानच्या हद्दीत उतरावं लागलं.

'हिन्दुस्तान टाइम्स'ने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार, विंग कमांडर अभिनंदन यांच्या मिग-21 (MiG-21)मध्ये अँटी जॅमिंग टेकनिक असती तर त्यांच्यापर्यंत सूचना पोहचल्या असत्या आणि ते भारतात परत आले असते. पण यातच पाकिस्तानने रडीचा डाव खेळत अभिनंदन यांच्या विमानाची कम्यूनिकेशन सिस्टम जाम केली आणि त्यांना पाकिस्तानध्ये उतरण्यास भाग पाडलं.

14 फेब्रुवारी 2019 ला जम्मू-काश्मीरमधील पुलवामामध्ये सीआरपीएफच्या ताफ्यावर मोठा दहशतवादी हल्ला झाला होता. यामध्ये 40 जवान शहीद झाले होते. या हल्ल्याचा बदला घेण्यासाठी 13 दिवसांनंतर भारतीय हवाई दलानं कुरापती पाकिस्तानविरोधात एअरस्ट्राईक केला आणि बालाकोट परिसरातील दहशतवाद्यांची तळं उद्ध्वस्त केली.

इतर बातम्या - VIDEO: 'माझ्या धन्या, मी दम सोडला पण...' मनाला चटका लावणारी कविता!

Loading...

बालाकोटमध्ये भारतीय वायुसेनाकडून करण्यात आलेल्या कारवाईनंतर चौताळलेल्या पाकिस्तानने 2 दिवसात त्यांच्या एफ-16 या लढाऊ विमानाने भारतीय हद्दीत घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी विंग कमांडर अभिनंदन यांनी मिग-21 या विमानाने पाकिस्तानच्या विमानाला भारतीय हद्दीत पाडलं. पण त्याला उद्ध्वस्त केल्यानंतर ते पाकिस्तानच्या हद्दीत जाऊन पडलं.

या सगळ्यानंतर पाकिस्तानने विंग कमांडर अभिनंदन यांना घेरलं आणि ताब्यात घेतलं. यावेळी अभिनंदन यांचे अनेक व्हिडिओ पाकिस्तानकडून सोशल मीडियावर शेअर करण्यात आले होते. अशात अभिनंदन यांना भारताला सुपूर्त करण्यासाठी आंतरराष्ट्रीय दबाव टाकण्यात आला तेव्हा अभिनंदन हे भारतात परतले.

असं धाडस करू नका, तलावात उडी मारणे तरुणाला पडले महागात, पाहा हा VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 14, 2019 11:54 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...