केंद्र सरकारचा मोठा निर्णय, खासदारांची वर्षभरासाठी 30 टक्के वेतन कपात

केंद्र सरकारचा मोठा निर्णय, खासदारांची वर्षभरासाठी 30 टक्के वेतन कपात

राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान यांच्यासह सगळ्या खासदारांच्या पगारात 30 टक्क्यांची कपात करण्यात येणार आहे

  • Share this:

नवी दिल्ली, 6 एप्रिल : कोरोनाशी (Covid -19) लढा देण्यासाठी देशभरातून मदतीचे हात पुढे येत आहे. कोरोनाच्या (Coronavirus) लढ्यासाठी वैद्यकीय उपकरणं आदी वस्तूंसाठी मोठ्या निधीची आवश्यकता आहे. यातच केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर (Prakash Javdekar) यांनी यासंदर्भात माहिती दिली.

आर्थिक वर्ष 2020-21 या काळासाठी खासदारांच्या वेतनात 30 टक्के कपात करण्यात येणार आहे. 1 एप्रिल 2020 पासून हे लागू होईल. कोरोनाच्या लढ्यात निधीची आवश्यकता असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. तूर्तास 12 महिन्यांसाठी हा निर्णय घेण्यात आला असून याबाबतच्या अध्यादेशाला कॅबिनेटच्या बैठकीत मंजुरी देण्यात आल्याचे प्रकाश जावडेकर यांनी सांगितले. कोरोनाच्या लढ्यात मदतीचा हात म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे. याशिवाय खासदार निधी दोन वर्षांसाठी निलंबित करण्यात येत आहे, असेही जावडेकरांनी सांगितले.

संबंधित - 'मृत्यूंची संख्या वाढत आहे...आता तरी गांभीर्य ओळखा', अजित पवारांचं आवाहन

यावेळी राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान यांच्यासह सगळ्या खासदारांच्या पगारात 30 टक्क्यांची कपात करण्यात येणार आहे. कोरोनाच्या संकटाशी सामना करण्यासाठी सर्वांनी एकत्र यायला हवं. यापूर्वी राज्य सरकारने आमदारांचे एक महिन्याचे वेतन कोरोनासाठी वापरण्यात असल्याचं सांगितलं होते. त्यापार्श्वभूमीवर केंद्राचा हा मोठा निर्णय़ आहे. देशभरात कोरोनाचा आकडा 4000 च्या पार गेला आहे. देशात लॉकडाउन असूनही कोरोनाग्रस्तांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे, अशी माहिती आज केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आली.  गेल्या 24 तासांत देशात 693 लोकांना कोरोनाची लागण झाल्याचं उघड झालं. काल दिवसभरात 30 कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झाला. आज आत्तापर्यंत 2 मृत्यू नोंदले गेले आहेत. 24 तासांतल्या या 32 मृत्यूंमुळे भारतात कोरोनाबळींची संख्यासुद्धा 109 वर पोहोचली आहे

संबंधित - Corona Update : 24 तासांत 693 कोरोनारुग्ण; देशात कोरोनाबळींची संख्या 109

First published: April 6, 2020, 5:37 PM IST

ताज्या बातम्या