Home /News /national /

कसलं भारी! 9 वर्षांच्या लहान भावाला वाचवण्यासाठी मोठा भाऊ भिडला बिबट्याशी; बंधूप्रेमाचा नवा आदर्श

कसलं भारी! 9 वर्षांच्या लहान भावाला वाचवण्यासाठी मोठा भाऊ भिडला बिबट्याशी; बंधूप्रेमाचा नवा आदर्श

सध्याच्या काळात सख्खा भाऊदेखील संकटाच्या काळात पाठ फिरवतो, अशावेळी ही बातमी सर्वांनी सर्वांनी वाचावी अशीच आहे

    रायपुर, 13 नोव्हेंबर : वेळेप्रसंगी सख्खे देखील संकटाच्या वेळी पाठ फिरवतात अशा अनेक घटना तुम्ही पाहिल्या असतील. मात्र मध्य प्रदेशातील या भावाने आपल्या लहान भावाचा जीव वाचवण्यासाठी थेट बिबट्याशी मुकाबला केला. मध्यप्रदेशातील धमतरी जिल्ह्यातील नगरी भागात एका बिबट्यामुळे गेल्या चार ते पाच दिवसांपासून दहशत पसरली आहे. मात्र अशाही प्रसंगात या मोठ्या भावाने जिवाची पर्वा न करता आपल्या लहान भावाना वाचवून नवा आदर्श निर्माण केला आहे. 13 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 6 वाजता नगरीपासून पाच किलोमीटर दूर संबलपुर गावातील एका नऊ वर्षांच्या लहानग्यावर बिबट्याने हल्ला केला होता. मुलाचा आवाज ऐकून त्याचा सख्खा भाऊ घरातून बाहेर आला. लहान भावावर बिबटा हल्ला करतोय हे पाहून मोठ्या भावाने जिवाची पर्वा न करता आपल्या लहान भावाला बिबट्याच्या हल्ल्यापासून वाचवलं. मिळालेल्या माहितीनुसार संबलपूर गावातील 9 वर्षीय पुनील शोरी शुक्रवारी सायंकाळी आपल्या घराजवळ खेळत होता. यादरम्यान बिबट्याने मुलावर हल्ला केला. बिबट्याने या मुलाच्या डोक्यावर हल्ला केला. मुलाचा आवाज ऐकताच त्याचा मोठा भाऊ हरि (18 वर्षीय) बिबट्याशी भिडला. यात बिबट्या घाबरुन जंगलाच्या दिशेने पळाला. गावाचे सरपंच प्रतिनिधी रवि बिसेन, माजी जनपद सदस्य आदी तत्काळ गाडीतून जखमी मुलाला सरकारी रुग्णालयात घेऊन गेले. हे ही वाचा-सॅनिटरी पॅडमध्ये सोनं लपवून तस्करी करीत होत्या 2 महिला; असा लागला सुगावा येथे प्राथमिक उपचार घेतल्यानंतर त्याला धमतरी रुग्णालयात हलविण्यात आले. मुलाच्या पाठीवर, डोक्यावर आणि छातीवर बिबट्याच्या पंज्याच्या खुणा आहेत. सध्या मुलाची तब्येत बरी आहे. गेल्या अनेक दिवसांपासून या बिबट्याने गावात दहशत माजवली आहे. माजी सरपंचांची पत्नीवर हल्ला केल्यानंतर दुसऱ्या दिवशी एका गायीची शिकार केली होती.13 नोव्हेंबर रोजी एका 9 वर्षीय लहानग्यावर हल्ला केल्यामुळे या परिसरात बिबट्याची भीती अधिक वाढली आहे. लहान भावाला वाचविणाऱ्या हरिचं गावभरात कौतुक होत आहे. याने आपल्या जिवाची पर्वा न करता लहान भावाचा जीव वाचवला.
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    पुढील बातम्या