मराठी बातम्या /बातम्या /देश /

मोठी बातमी : सोनिया गांधींचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना फोन, विधानसभा अध्यक्षपदावर झाली चर्चा - सूत्र

मोठी बातमी : सोनिया गांधींचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना फोन, विधानसभा अध्यक्षपदावर झाली चर्चा - सूत्र

सोनिया गांधी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना फोन केला आहे. दोन्ही नेत्यांमध्ये ममहत्त्वाच्या विषयावर चर्चा झाली आहे.

सोनिया गांधी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना फोन केला आहे. दोन्ही नेत्यांमध्ये ममहत्त्वाच्या विषयावर चर्चा झाली आहे.

सोनिया गांधी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना फोन केला आहे. दोन्ही नेत्यांमध्ये ममहत्त्वाच्या विषयावर चर्चा झाली आहे.

नवी दिल्ली, 21 डिसेंबर : राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशनाला (Maharashtra Assembly Session) आजपासून सुरुवात झाली आहे. मात्र, या अधिवेशनात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे प्रकृतीच्या कारणास्तव उपस्थित नाहीयेत. त्याच दरम्यान सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांना फोन केला आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, विधानसभा अध्यक्षपदाच्या संदर्भात दोन्ही नेत्यांच्यात चर्चा झाली आहे.

विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडीसंदर्भात खलबतं सुरू आहेत. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, विधानसभा अध्यक्षपदासाठी दोन नावांचा प्रस्ताव काँग्रेस हायकमांडकडे आलं आहे. यामध्ये संग्राम थोपटे आणि पृथ्वीराज चव्हाण या नावांचा प्रस्ताव असल्याची माहिती समोर येत आहे. पण कुठल्या नावावर शिक्कामोर्तब करावा या संदर्भात आपल्या सहयोगी पक्षासोबत सोनिया गांधी यांनी पोनवरुन चर्चा केली आहे आणि त्यासाठीच सोनिया गांधी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना फोन केला आहे.

वाचा : "....तर उद्धव ठाकरे रश्मी ठाकरेंना मुख्यमंत्री करु शकतात" : चंद्रकांत पाटील

काल काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे दिल्लीत उपस्थित होते. दिल्लीत सोनिया गांधी याच्यासोबत बैठक झाल्यावर नाना पटोले यांनी प्रतिक्रिया दिली होती. विधानसभा अध्यक्षपदासाठी काँग्रेसमधील एका मंत्र्याची वर्णी लागण्याची शक्यता आहे. अध्यक्षपदाची निवडणूक जाहीर झाल्यावर हायकमांड निर्णय घेईल, असं सूचक विधान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिले. नागपूर विधान परिषद निवडणुकीत पराभवामुळे काँग्रेस हायकमांडने नाना पटोले, नितीन राऊत आणि सुनील केदार यांना समन्स बजावला होता. दिल्लीत तिन्ही नेत्यांनी हायकमांडसोबत चर्चा केली. या बैठकीनंतर नाना पटोले यांनी माध्यमांशी संवाद साधला.

या हिवाळी अधिवेशनामध्ये अध्यक्षाची निवड केली जाईल. काँग्रेसची आधीपासून आग्रहाची मागणी राहणार आहे. 26 ते 27 पर्यंत अध्यक्षपदाची निवड केली जावी, अशी आमची भूमिका आहे. याबद्दल हायकमांडसोबत चर्चा झाली. मला वाटत अधिवेशनामध्ये अध्यक्षाची निवड होईल' असं नाना पटोले म्हणाले.

'अध्यक्षपदाची निवड करण्यासाठी काँग्रेसमधून कोणत्या मंत्र्याला राजीनामा द्यावा लागणार आहे का? असा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता पटोले म्हणाले की, 'हा निर्णय हायकमांडचा आहे. कुणाची निवड करायची आहे, त्याबद्दलचा निर्णय हायकमांड घेत असते. अध्यक्षापदाबद्दल अद्याप कोणत्याही नावाची चर्चा झाली नाही. ज्या दिवशी निवडणुकीचे माहिती समोर येईल, तेव्हा हायकमांडकडून निर्णय घेतला जाईल.'

First published:

Tags: Shiv sena, Sonia gandhi, Uddhav thackeray, Winter session