निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर Big breaking; बिहार काँग्रेस मुख्यालयावर Income Tax चा छापा, लाखो रुपये जप्त

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर Big breaking; बिहार काँग्रेस मुख्यालयावर Income Tax चा छापा, लाखो रुपये जप्त

काळ्या पैशाच्या (Black Money) देवाण-घेवाणीचा आरोप

  • Share this:

पाटना, 22 ऑक्टोबर :  बिहारच्या राजकारणातून (bihar election) मोठी बातमी समोर आली आहे. आयकर विभागाच्या (Income Tax) टीमने पाटनातील काँग्रेस कार्यालय सदाकत आश्रममध्ये छापा मारला आहे. सांगितले जात आहे की, काँग्रेस कार्यालयात पोहोचलेल्या इनकम टॅक्स विभागाच्या टीमने लाखो रुपये जप्त केले आहेत. सदाकत आश्रमात नेत्यांची चौकशी सुरू आहे. यादरम्यान काँग्रेस कार्यालयावर नोटीस लावण्यात आली आहे. सांगितले जात आहे की, हा छापा साधारण एक तास सुरू होता, यामध्ये लाखो रुपयांच्या देवाण-घेवाणीत अनेक नेत्यांची चौकशी करण्यात आली आहे.

सांगितले जात आहे की इनकम टॅक्स विभागाच्या रडारवर काँग्रेस पक्षाशी संबंधित काही मूळचे बिहारच्या असलेल्या स्थानिक नेत्यांचा समावेश आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी झालेल्या संशयास्पद देवाण-घेवाणबाबत त्यांची चौकशी केली जाणार आहे.

हे ही वाचा-एका क्षणात होत्याच नव्हतं झालं; दाम्पत्याचा दुर्देवी अंत

बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चुकीच्या माध्यमातून काळ्या पैशाच्या (Black Money) देवाण-घेवाणीचा आरोप आहे. हीदेखील माहिती समोर आली आहे की, बिहारचे काही स्थानिक नेते व तेथील काही स्थानिक लोकांमध्ये लाखो-कोटी रुपयांच्या देवाण-घेवाणीच्या प्रकरणात इनकम टॅक्स विभागाची टीम चौकशी करणार आहे.

Published by: Meenal Gangurde
First published: October 22, 2020, 7:11 PM IST

ताज्या बातम्या