बिग बींच्या 'त्या' ट्विटमुळे सगळे संभ्रमात!

बिग बींच्या 'त्या' ट्विटमुळे सगळे संभ्रमात!

त्याच वेळी म्हणजे 1 वाजून 13 मिनिटांनी बिग बी अमिताभ बच्चन यांनी एक ट्विट केलं. न जाने क्यूँ , एक अजीब सी घबराहट हो रही है!!. या ट्विटची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे.

  • Share this:

25 फेब्रुवारी : श्रीदेवींचं निधन व्हायच्या वेळी बिग बींनी एक ट्विट केलं. त्यामुळे सगळेच संभ्रमात पडलेत.

देशाच्या लाडक्या अभिनेत्री श्रीदेवी यांचं रात्री एक दे दीड दरम्यान दुबईत निधन झालं.  त्याच वेळी म्हणजे 1 वाजून 13 मिनिटांनी बिग बी अमिताभ बच्चन यांनी एक ट्विट केलं. न जाने क्यूँ , एक अजीब सी घबराहट हो रही है!!. या ट्विटची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे.

अमिताभ यांना 6th सेन्समुळे काही जाणवलं का ? त्यांना कुणाचा फोन आला होता का ? अमिताभना नेमकं याच रात्री असं ट्विट करावंसं का वाटलं ? याचं उत्तर तेच देऊ शकतील, पण एवढ्यात ते देतील असं वाटत नाही..

मला निद्रानाश आहे, त्यामुळे मी अनेकदा पहाटे झोपी जातो, असं खुद्द अमिताभ यांनीच सांगितलं होतं. त्यामुळे अनेकदा त्यांचा ब्लॉगही पहाटे अपडेट होतो. असो. बिग बी आणि श्रीदेवींचा परिचय बराच जुना आहे. खुदा गवाहमध्ये त्यांनी एकत्र काम केलं होतं.

1992 साली हा चित्रपटात या अनोख्या जोडीमुळेही गाजला. एका बाजूला बॉलिवूडचा शेहनशहा, तर दुसरीकडे 80च्या दशकाची महाराणी.

अशा या कर्तबगार सहकलाकाराच्या मृत्यूबद्दल अमिताभ यांना कळलं होतं का, त्यांना कुठली वेगळीच जाणीव झाली होती का, बिग बींनीच याचं उत्तर द्यावं, अशी सर्व चाहत्यांची भावना आहे.

First published: February 25, 2018, 3:05 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading