Home /News /national /

अमरसिंगांच्या निधनावर अमिताभ बच्चन यांचा भावुक ब्लॉग, म्हणाले...

अमरसिंगांच्या निधनावर अमिताभ बच्चन यांचा भावुक ब्लॉग, म्हणाले...

दिल्लीतल्या सत्तेच्या वर्तुळात त्यांचं नाव असल्याने सगळ्याच क्षेत्रातले दिग्गज त्यांच्याशी मैत्री करत असतं

दिल्लीतल्या सत्तेच्या वर्तुळात त्यांचं नाव असल्याने सगळ्याच क्षेत्रातले दिग्गज त्यांच्याशी मैत्री करत असतं

अमिताभ आणि अमरसिंग यांचे कौटुंबिक संबंध होते. काही काळ त्यांच्यात मतभेदही निर्माण झाले होते. मात्र नंतर ते संबंध पुन्हा सुरळीत झाले.

    मुंबई 1 ऑगस्ट: खासदार आणि समाजवादी पक्षाचे माजी नेते अमरसिंग यांच्या निधनावर बीग-बी अमिताभ बच्चन यांनी भावुक ब्लॉग लिहिला आहे. हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असतानाही त्यांनी हा ब्लॉग लिहून अमितभ बच्चन यांनी श्रद्धांजली अर्पण केलीय. अमिताभ म्हणाले, आज मी नतमस्तक झालो आहे. फक्त प्रार्थना करण्याशिवाय माझ्या हातात काहीच काही. अतिशय जवळचा माणूस, महान आत्मा गेला आहे. असं म्हणत त्यांनी मान झुकलेला फोटो ट्विटरवर शेअर केला आहे. अमिताभ आणि अमरसिंग यांचे कौटुंबिक संबंध होते. काही काळ त्यांच्यात मतभेदही निर्माण झाले होते. मात्र नंतर ते संबंध पुन्हा सुरळीत झाले. अमरसिंग यांचे दीर्घ आजाराने शनिवारी प्रदीर्घ आजाराने निधन झाले. ते 64 वर्षांचे होते. सिंगापूरच्या Mount Elizabeth Hospital मध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या 7 महिन्यांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. किडनीच्या आजारामुळे ते गेले काही वर्ष ते उपचार घेत होते.  2013 मध्ये त्यांच्या किडन्या निकामी झाल्या होत्या. त्यानंतर त्यांच्यावर शस्रक्रियाही करण्यात आली होती. मात्र त्यांची प्रकृती चांगली झालीच नाही. त्यांच्या मागे पत्नी पंकजा सिंह आणि दोन मुली दृष्टी आणि दिशा आहेत. उपचारांसाठी त्यांना नंतर सिंगापूरला हलविण्यात आले होते. पण त्यांच्या प्रकृतीत सुधारणा अखेर झालीच नाही. अनेक वर्ष ते समाजवादी पक्षात महत्त्वाच्या भूमिकेत होते. दीर्घकाळ त्यांनी समाजवादी पक्षाचे महासचिव हे पदही भुषवलं होतं. त्यावेळी मुलायमसिंग यादव हे अमरसिंग यांच्याच सल्ल्याने कारभार करत असल्याचं म्हटलं जात होतं. अमरसिंगांचं बॉलिवूडशी होतं ‘कलरफूल’ नातं, जया प्रदांना बनवलं थेट खासदार नंतर मात्र त्यांच्यात मतभेद होत गेले. समाजवादी पक्षाचा कारभार अखिलेश सिंग यांच्याकडे आल्यानंतर त्यांच्यातली दरी वाढतच गेली होती. त्यानंतर ते समाजवादी पक्षातून बाहेर पडले. नंतर त्यांनी भाजपशी जवळीक साधली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना त्यांनी आपला पाठिंबा व्यक्त केला होता.
    Published by:Ajay Kautikwar
    First published:

    पुढील बातम्या