जीवाची बाजी लावून कोरोनाविरोधात लढणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी मोठी घोषणा

जीवाची बाजी लावून कोरोनाविरोधात लढणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी मोठी घोषणा

वैद्यकीय कर्मचाऱ्यांचा कोरोनाच्या रुग्णांशी थेट संबंध येतो. त्यामुळे त्यांच्या जीवाला अधिक धोका असतो

  • Share this:

नवी दिल्ली, 27 मार्च : देशभरात कोरोनाचा (Coronvirus) कहर वाढत आहे. देशातील कोरोनाग्रस्तांचा (Covid - 19) आकडा वाढतच चालला आहे. आतापर्यंत देशात 18 जणांचा मृत्यू झाल्याची बाब समोर आली असून भविष्यात ही संख्या वाढण्याची भीती आहे.

अशा परिस्थितीत देशातील आरोग्य सेवा देणारे कर्मचारी जीवाची बाजी लावून लढा देत आहेत. नियमित येणाऱ्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार करताना त्यांच्या जीवालाही धोका असू शकतो. मात्र हे वैद्यकीय कर्मचारी एखाद्या कमांडोज प्रमाणे कोरोनाशी लढा देत आहेत. याची काळजी घेत केंद्र विभागाने वैद्यकीय कर्मचाऱ्यांसाठी 50 लाख रुपयांच्या विम्याची घोषणा केली आहे. कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावाखाली काम करणाऱ्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांसाठी हे आवश्यक असल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. यानुसार देशातील तब्बल 22 लाख कर्मचाऱ्यांना या लाभ मिळणार आहे.

संबंधित - कोरोनाच्या उद्रेकात कर्मचाऱ्यांच्या कामाचे कौतुक, कंपनीकडून 25 टक्के जादा पगार

देशभरात कोरोना व्हायरसच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. मुंबईत आणखी एका रुग्णाचा Coronavirus ने बळी घेतल्याचं समोर आलं आहे. इथल्या हिंदुजा रुग्णालयात काल रात्रीच एका 82 वर्षांच्या डॉक्टरांचा मृत्यू झाला. त्यांची Covid-19 ची चाचणी पॉझिटिव्ह आली होती.भारतातही मृत्यूचा आकडा वाढतो आहे. आतापर्यंत आपल्या देशात 17 जणांचा प्राण या विषाणूने घेतला आहे. भारतात आतापर्यंत 724 रुग्ण सापडले असून त्यातले 66 बरे झाले आहेत, तर 17 मृत्युमुखी पडले आहेत.

बापरे... स्पेन आणि इटलीत ‘मॉल’चं झालं शवगृह, दफविधीसाठीही वेटिंगलिस्ट

महाराष्ट्रात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. राज्यात आज एकूण 17 नवीन रुग्ण आढळले आहे. सांगलीमध्ये आज नवे 12 रुग्ण आढळले आहे. तर नागपूरमध्ये 5 रुग्ण आढळले असून राज्यात एकूण कोरोनाबाधितांची संख्याही तब्बल 147 वर पोहोचली आहे.

First published: March 27, 2020, 7:08 PM IST

ताज्या बातम्या