अचानक कोसळली भिंत, मलब्यात दबून 8 मजुरांचा मृत्यू, 6 जखमी

अचानक कोसळली भिंत, मलब्यात दबून 8 मजुरांचा मृत्यू, 6 जखमी

या दुर्घटनेनंतर, मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी मृतांच्या कुटुंबियांना 2 लाख आणि जखमींना 40 हजार आर्थिक मदत देण्याची घोषणा केली आहे.

  • Share this:

जोधपूर, 11 नोव्हेंबर : जोधपूरमध्ये मंगळवारी भयंकर अपघात झाला. येथे एका निर्माणाधीन फॅक्ट्रीची भिंत आणि त्याचा एक भाग अचानक कोसळला. या दुर्घटनेत 8 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 6 हून अधिक लोक गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

या अपघाताची माहिती मिळताच पोलीस आणि स्थानिक नागरिकांच्या मदतीने बचावकार्य सुरू करण्यात आलं. संबंधित यंत्रणांकडून रेस्क्यू ऑपरेशनदरम्यान, ढिगाऱ्याखालून दोघांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले. रात्री उशिरापर्यंत सुरू असलेल्या रेस्क्यू ऑपरेशनदरम्यान 8 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती असून 6 लोक गंभीर आहेत.

क्रेन चालकाच्या निष्काळजीपणामुळे अपघात -

एका रिकाम्या प्लॉटवर बांधकाम सुरू असल्याची माहिती आहे. मंगळवारी संध्याकाळी 6 वाजण्याच्या दरम्यान ही दुर्घटना घडली. जिल्हा कलेक्टर इंद्रजित सिंह यांनी प्राथमिकदृष्ट्या दिलेल्या माहितीनुसार, छत टाकण्याचं काम सुरू होतं. यादरम्यान क्रेन चालकाच्या निष्काळजीपणामुळे भींत कोसळून मोठी दुर्घटना घडली. याबाबत पुढील तपास सुरू आहे.

या दुर्घटनेनंतर, मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी मृतांच्या कुटुंबियांना 2 लाख आणि जखमींना 40 हजार आर्थिक मदत देण्याची घोषणा केली आहे. माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे, माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट, केंद्रीय मंत्री गजेंद्र सिंह शेखावत आणि राजस्थान क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष वैभव गहलोत यांच्यासह अनेकांनी ट्विटरवरून या दुर्घटनेत मृत्यू झालेल्यांप्रती दु:ख व्यक्त केलं आहे.

Published by: Karishma Bhurke
First published: November 11, 2020, 10:10 AM IST
Tags:

ताज्या बातम्या