Covid रुग्णालयाला भीषण आग; ICU तील 4 रुग्णांचा दुर्देवी मृत्यू

रुग्णालयात अचानक लागलेल्या आगीमुळे चौघांचा मृत्यू झाला असून 40 कोरोना रुग्णांवर परिणाम झाला आहे.

रुग्णालयात अचानक लागलेल्या आगीमुळे चौघांचा मृत्यू झाला असून 40 कोरोना रुग्णांवर परिणाम झाला आहे.

  • Share this:
    रायपुर, 17 एप्रिल : रायपुर स्थित राजधानी रुग्णालयाच्या आयसीयूमध्ये आग लागल्या कारणाने 4 रुग्णांचा मृत्यू झाल्याचे वृत्त समोर आले आहे. आग लागण्याचे कारण पंख्याला झालेलं शॉर्ट सर्किट असल्याचं सांगितलं जात आहे. तर रुग्णालयाच्या खिडक्या तोडून धूर बाहेर काढण्यात आल्याने अनेक रुग्णांचा जीव बचावला आहे. मिळालेल्या माहितीनुसार पचपेडी नाक्यावर राजधानी रुग्णालय स्थित आहे. या रुग्णालयात कोरोना रुग्णांवर उपचार सुरू होतं. शॉर्ट सर्किटमध्ये रुग्णालयात आग लागली आणि आयसीयूमध्ये मोठ्या प्रमाणात धुर झाला. त्यानंतर खिडकी तोडून धूर बाहेर काढण्यात आला आणि आगीवर नियंत्रण आणण्यात आलं. मात्र यातही 4 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. घटनेच्या वेळी आयसीयूमध्ये 9 रुग्ण होते. या दुर्घटनेत 40 हून अधिक रुग्णांवर परिणाम झाला आहे. सध्या रुग्णांना दुसऱ्या रुग्णालयात हलविण्यात आलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार एक रुग्णाचा मृत्यू आगीत जळाल्यामुळे आणि तिघांचा मृत्यू गुदमरल्यामुळे झाला आहे. माहिती मिळताच फायर ब्रिगेडच्या गाड्या तातडीने घटनास्थळी पोहोचल्या व आगीवर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न करीत होत्या. सूचना मिळताच कलेक्टर आणि अन्य वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी पोहोचले. या दुर्घटनेत 40 हून अधिक रुग्णांवर परिणाम झाला आहे. हे ही वाचा-आंतरजिल्हा, आंतरराज्य प्रवासाच्या निर्बंधांबाबत केंद्राचे राज्यांना निर्देश आग लागल्यानंतर तातडीने रुग्णांना बाहेर काढण्यात आलं. त्याशिवाय काही रुग्ण स्वत:च उठून बाहेर निघून गेले. ज्या आयसीयू सेंटरला आग लागली होती, तेथे गोंधळ निर्माण झाला. शॉर्ट सर्किटमध्ये आग लागली होती. मात्र रुग्णालय प्रबंधनाच्या निष्काळजीपणामुळे या आगीने भीषण रुप घेतल्याचा आरोप केला जात आहे. या घटनेनंतर अनेक रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक तणावात, रडत असताना दिसून आले. आगीत जळाल्यामुळे रमेश साहू या रुग्णाचा मृत्यू झाला आहे. त्याशिवाय ईश्वर राव, वंदना गजमाला आणि देविका सोनकर यांचा गुदमरल्यामुळे मृत्यू झाला. मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी ही घटना अत्यंत दुर्देवी असल्याचं सांगितलं. त्यांनी शोक व्यक्त केला आणि कुटुंबासोबत असल्याचंही सांगितलं. या घटनेत मृत्यू झालेल्या कुटुंबांना 4 लाखांचा मदतनिधी देण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे.
    Published by:Meenal Gangurde
    First published: