मोठा अपघात! भोपाळ रेल्वे स्टेशनच्या ओव्हर ब्रिजचा काही भाग कोसळला, 9 जणं जखमी

रेल्वे प्रशासनाने सांगितल्यानुसार त्यातील एकाची प्रकृती चिंताजनक आहे

रेल्वे प्रशासनाने सांगितल्यानुसार त्यातील एकाची प्रकृती चिंताजनक आहे

  • Share this:
    भोपाळ, 13 फेब्रुवारी : भोपाळ रेल्वे स्टेशनवर (Bhopal Railway Station) एक मोठी दुर्घटना घडली आहे. येथील स्टेशनवर ओव्हरब्रिजच्या पायऱ्या कोसळल्याने तब्बल 9 प्रवासी जखमी झाले आहेत. यापैकी एका प्रवाशाची प्रकृती गंभीर आहे. जखमींना तत्काळ रुग्णालयात हलविण्यात आले आहे. रेल्वे आणि प्रशासन सर्वांना तातड़ीने मदत मिळावी यासाठी प्रयत्न करीत आहे. सध्या ढिगारा हटविण्याचे काम सुरू आहे. हा ब्रिज कसा कोसळला, याच्या तपासाचे आदेश देण्यात आले आहे. काही महिन्यांपूर्वी मुंबईतील CSMT स्थानकाजवळी प्रवाशांसाठी असलेला फूट ओव्हर ब्रिज कोसळला होता. यामुळे अनेक जणं जखमी झाले होते. बुधवारी भोपाळ स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक तीनवर ओव्हरब्रिज पायर्‍या अचानक कोसळल्या. यामुळे पायऱ्यांवरील प्रवासी थेट खाली कोसळून ढिगाऱ्यात अडकले. येथे सकाळच्या वेळेत प्रवाशांची गजबज असते. अशावेळात ही दुर्घटना घडल्याने रेल्वे परिसरात खळबळ झाली आहे. या स्टेशनवरील अनेक ब्रिज खिऴखिळे झाले आहेत. यामुळे अनेक प्रवासी ढिगाऱ्याखाली अडकले. यापैकी 7 ते 8 जण जखमी झाल्याचे सांगितले जात आहे. यापैकी एका प्रवासाची प्रकृती गंभीर आहे. जखमींना भोपाळमधील हमीदिया रुग्णालय आणि जुन्या भोपाळच्या चिरायु रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यावेळी घटनास्थळी उपस्थित असलेले कर्मचारी आणि स्टेशनवर उपस्थित प्रवाशांनी विलंब न करता ऑटो आणि रुग्णवाहिकेच्या मदतीने जखमींना रुग्णालयात हलविले. रेल्वेच्या PRO नी सांगितलं सुदैवाने जीवितहानी नाही भोपाळ स्टेशनवरील दुर्घटनेनंतर रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले, या दुर्घटनेत आठ ते नऊ जणं जखमी झाले आहेत. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही.  या अपघातामुळे रेल्वे सेवेवर परिणाम झाला. रेल्वे प्रशासनाने तातडीने जखमी प्रवाशांना रुग्णालयात पोहोचविले. रेल्वे प्रशासनाने सांगितल्यानुसार त्यातील एकाची प्रकृती चिंताजनक आहे. जखमींना भोपाळच्या हमीदिया रुग्णालय आणि जुने भोपाळच्या चिरायू रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. स्टेशनवर उपस्थित रेल्वे कर्मचारी आणि प्रवाशांनी जखमींना ऑटो व रुग्णवाहिकेत उशीर न करता रुग्णालयात दाखल केले. MP चे मंत्री मंत्री म्हणाले, केंद्राला पत्र लिहू भोपाळ रेल्वे स्थानकात झालेल्या अपघातानंतर मध्य प्रदेशचे कायदामंत्री पीसी शर्मा म्हणाले की, आपण यासंदर्भात रेल्वेमंत्री आणि रेल्वे विभागाला पत्र लिहू. अशा प्रकारच्या घटना पुन्हा घडू नयेत म्हणून रेल्वे सेतू व उड्डाणपुलांची तपासणी करण्याची मागणी केंद्राकडे करणार आहे. पीसी शर्मा यांनी प्रशासकीय चौकशी करण्याबाबतही सांगितले आहे.
    First published: