शपथ घेतल्यानंतर दोन तासातच छत्तीसगढ मधल्या शेतकऱ्यांचं कर्ज माफ

निवडणुकीत काँग्रेसनं कर्जमाफीचं आश्वासन दिलं होतं.

News18 Lokmat | Updated On: Dec 17, 2018 10:53 PM IST

शपथ घेतल्यानंतर दोन तासातच छत्तीसगढ मधल्या शेतकऱ्यांचं कर्ज माफ

रायपूर, 17 डिसेंबर : मध्यप्रदेश पाठोपाठ छत्तीसगढचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी शपथ घेतल्यानंतर दोन तासातच राज्यातल्या शेतकऱ्यांचं कर्ज माफ केलं. कर्जमाफी हा त्यांनी घेतलेला पहिलाच निर्णय होता. त्यामुळं काही लाख शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. निवडणुकीत काँग्रेसनं कर्जमाफीचं आश्वासन दिलं होतं.


मध्य प्रदेशमध्ये काँग्रेस सरकार स्थापन झाल्यानंतर पहिल्याच दिवशी मुख्यमंत्री कमलनाथ यांनी शेतकरी कर्जमाफीचा निर्णय घेतला होता. शेतकऱ्यांची कोणत्याही नियम आणि अटींशिवाय सरसकट कर्जमाफी करण्यात आली आहे.

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी निवडणूक प्रचारात मध्य प्रदेशातील शेतकऱ्यांना कर्जमाफीचं आश्वासन दिलं होतं.


Loading...

निवडणूक विजयानंतर राहुल यांनी कर्जमाफीवर केलेल्या विधानावरून विरोधकांकडून त्यांना टार्गेट करण्यात आलं. पण अखेर काँग्रेसने कर्जमाफी करून विरोधकांना उत्तर दिलं आहे.

निवडणूक जिंकल्यावर घेतलेल्या पत्रकार परिषदेत राहुल गांधी म्हणाले होते की, कर्जमाफी हे शेतीवरील शेवटचं उत्तर नाही.


शेती प्रश्नावरील उत्तर खूप अवघड आहे. आम्ही ते शोधण्याचा प्रयत्न करू. आम्ही कर्जमाफीदेखील देऊ.' कर्जमाफीशिवायच स्थानिक पातळीवर चालणारा प्रचंड भ्रष्टाचार, शेतकऱ्यांचे विविध प्रश्न, ग्राम पंचायत पातळीवर गोशाळा उभारणी हे प्रश्न मार्गी लावणं, हे आपल्या सरकारचे पहिले प्राधान्य असेल, असं कमलनाथ म्हणाले आहेत.

मुंबई कामगार रुग्णालय आगीचा मोठा खुलासा, या चुकीमुळे झाला 6 जणांचा मृत्यू

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 17, 2018 10:46 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...