S M L

दिल्लीकरांनो फटाके फोडायचे असतील तर भोपाळला या-म.प्र. गृहमंत्र्यांची ऑफर

पीटीआयच्या वृत्तानुसार दिल्लीच्या नागरिकांना फटाके फोडता येतील अशी सगळी व्यवस्था भोपाळमध्ये करण्यात येईल असंही भुपेंद्र सिंह यांनी सांगितलं

Chittatosh Khandekar | Updated On: Oct 11, 2017 12:32 PM IST

दिल्लीकरांनो फटाके फोडायचे असतील तर भोपाळला या-म.प्र. गृहमंत्र्यांची ऑफर

भोपाळ,11 ऑक्टोबर: दिल्लीच्या नागरिकांना जर फटाके फोडून दिवाळी साजरी करायची असेल तर त्यांनी भोपाळला यावं असं धक्कादायक विधान मध्यप्रदेशचे राज्य गृहमंत्री भुपेंद्र सिंह यांनी केलं आहे. सुप्रीम कोर्टाने दिल्ली आणि परिसरात फटाके विक्रीस बंदी केल्यानंतर त्यांनी हे विधान केलं आहे.

पीटीआयच्या वृत्तानुसार दिल्लीच्या नागरिकांना फटाके फोडता येतील अशी सगळी व्यवस्था भोपाळमध्ये करण्यात येईल असंही भुपेंद्र सिंह यांनी सांगितलं. तसंच फटाके फोडल्याने भोपाळच्या पर्यावरणाला काही धोका नाही असंही विधान त्यांनी केलं आहे.'आपण रामराज्य आणण्याच्या गप्पा करतो. पण जर राम वनवासातून घरी परत येण्याचा दिवाळीचा सणच जर आपण साजरा करू शकत नसू तर त्याला काय अर्थ आहे'. दिल्ली स्वच्छ आणि प्रदूषणमुक्त ठेवण्यासाठी हा फटाके विक्रीवर बंदी सुप्रीम कोर्टाने आणली आहे.या निर्णया वर बोलताना सिंह यांनी आप सरकारला ही टोला लगावला आहे. 'वाहनांमुळे प्रदूषित झालेली दिल्लीचं पर्यावरण सुधारण्यासाठी आप सरकारने मेहनत घ्यायला हवी'. तसंच शिवराजसिंह चौहान यांच्या राज्यात पर्यावरण उत्तम आहे असंही त्यांनी सांगितलंय

दरम्यान फटाकेबंदीच्या निर्णयाचं केंद्रीय पर्यावरण मंत्री यांनी ट्विटरवर स्वागत केलं होतं. पण नंतर या निर्णयावर टीका होऊ लागल्यावर त्यांचे ट्विट काढून घेण्यात आले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Oct 11, 2017 10:37 AM IST

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close