Home /News /national /

पुण्यातून साध्वी प्रज्ञाला पत्र, PM मोदी आणि योगींच्या फोटोंवर क्रॉस मार्क

पुण्यातून साध्वी प्रज्ञाला पत्र, PM मोदी आणि योगींच्या फोटोंवर क्रॉस मार्क

घरी आलेल्या पत्रात फोटोंवर खुणा करून जीवे मारण्याची धमकीच देण्यात आल्याचे सांगताना प्रज्ञा ठाकुर म्हणाल्या की, देशहिताचे काम करणाऱ्यांना टार्गेट केलं जात आहे.

    भोपाळ, 14 जानेवारी : भाजप खासदार साध्वी प्रज्ञा सिंग ठाकुर नेहमीच त्यांच्या वादग्रस्त वक्तव्याने चर्चेत राहिल्या आहेत. आता त्यांच्या घरी उर्दूत लिहिलेलं एक पत्र आणि त्यासोबत दोन पांढऱ्या रंगाच्या पावडरची पाकिटे पोहचल्यानं खळबळ उडाली आहे. पत्र उर्दू भाषेत लिहिण्यात आलं असून त्यावर पाठवणाऱ्याचा पत्ता पुण्याचा आहे. हे पत्र मिळताच प्रज्ञा सिंग यांनी पोलीस आणि एफएसएल च्या पथकाला माहिती दिली. त्यानंतर रात्री उशिरा चौकशी सुरू करण्यात आली आहे. याबाबत प्रज्ञा ठाकुर यांनी सांगितलं की, माझ्याविरुद्ध कट रचला जात असून जीवाला धोका आहे. पत्रात फोटोच्या समोर क्रॉस चिन्ह आहे. याआधीही धमकीची पत्रे मिळाली आहेत. पोलिसांकडे अनेकदा तक्रार करण्यात आली होती पण कोणतीच कारवाई केली जात नाही. उर्दू भाषेत असलेल्या या पत्रासोबत आणखी काही कागद होते. त्यामधून दोन प्लास्टिकची पाकिटेही होती. ती उघडल्यानंतर हाताला खाज सुटली. देशहिताचे काम करणाऱ्यांना लक्ष्य केलं जात असल्याचंही प्रज्ञा ठाकुर म्हणाल्या. दरम्यान, या पत्राची माहिती मिळताच पोलसांनी अधिक चौकशी सुरू केली. अतिरिक्त पोलीस अधीक्षक संजय जैन यांनी सांगितलं की, साध्वी यांच्याकडे आलेल्या पत्राची चौकशी सुरू आहे. या पत्रासोबत जी पावडर मिळाली त्याची तपासणी कऱण्याचे काम एफएसएलचे पथक करत आहे. पथकाने पावडर जप्त केली आहे. या प्रकरणाच्या चौकशीनंतरच काही सांगता येईल. पत्र पाठवणाऱ्याचा तपास सुरू आहे. पत्रावर असलेल्या पत्ता पाहता ते पुण्याहून आले असल्याचं जैन म्हणाले. पत्रासोबत पांढऱ्या पावडरची पाकिटे आणि फोटो आहेत. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, अजित डोवाल आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचाही फोटो आहे. यांच्या फोटोसमोर क्रॉस करण्यात आलं असून हातात शस्त्र घेतलेला एक फोटोही आहे. त्यासमोर साध्वी प्रज्ञा सिंग ठाकुर यांचा फोटो आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. 'पुस्तकाशी भाजपचा काही संबंध नाही, हा वाद आता संपला'
    Published by:Suraj Yadav
    First published:

    पुढील बातम्या