Elec-widget

लग्नासाठी मदत हवीय? तर नवरदेवाला पाठवावा लागेल 'टॉयलेट'सोबत सेल्फी!

लग्नासाठी मदत हवीय? तर नवरदेवाला पाठवावा लागेल 'टॉयलेट'सोबत सेल्फी!

सरकारी मदत मिळावी म्हणून लग्न घरी आता नवर देवाला सर्वात आधी 'टॉयलेट'सोबत सेल्फी घ्यावा लागणार आहे.

  • Share this:

भोपाळ 10 ऑक्टोंबर : 'टॉयलेट एक प्रेमकथा' हा अक्षय कुमारचा चित्रपट काही वर्षांपूर्वी चांगलाच गाजला होता. स्वच्छ भारत अभियानात प्रत्येक घरात टॉयलेट असावं असा सरकारचा आग्रह आहे. त्यामुळे खेड्या पाड्यांमध्ये घरा घरांमध्ये टॉयलेट्स तयार झालेत. मात्र अजुनही अनेक गावांमध्ये लोकांनी घरांमध्ये टॉयलेट्स बांधलेले नाहीत. त्यामुळे सरकारने आपल्या योजनांचा लाभ घ्यायला असेल तर घरात टॉयलेट दाखवा असं सांगितलंय. याचाच एक भाग म्हणून मध्यप्रदेश सरकारने (MP Government) एक अजब फर्मान काढलंय. लग्नासाठी सरकारी योजनेची मदत हवी असेल तर नवरदेवाला  टॉयलेटसोबत एक सेल्फी पाठवावा लागणार आहे. सरकारच्या या अजब निर्णयाला नवरदेवांनी विरोध केलाय.

लोकांना मूर्ख बनवू नका, राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल

मुख्यमंत्री साह्यता विवाह योजना अशी मध्यप्रदेश सरकारची एक योजना आहे. या योजनेत लग्नासाठी नवरदेवाला 51 हजारांची मदत दिली जाते. मात्र या नव्या नियमांमुळे नवरदेवाला लग्नाआधी नवरीसोबत फोटो काढण्याआधी टॉयलेट सोबत फोटो काढून तो अर्जाला लावावा लागणार आहे. लग्नाआधी प्रि वेडींग फोटोशूट केलं जातं पण सरकारच्या या नव्या नियमांमुळे आम्ही काय असे सेल्फी काढायचे काय असा सवाल आता विचारण्यात येतोय.

आजाराला कंटाळून वडिलांनी केली दोन मुलांची हत्या, GPSमुळे झाला खुलासा

Loading...

प्रत्येक घरात टॉयलेट्स बांधली जावीत यासाठी सरकारने हा निर्णय केल्याचं सरकारी अधिकाऱ्यांनी सांगितलंय. लग्नाला मदत मिळावी म्हणून अर्ज करताना आणि लग्नाच्या सर्टिफिकेटसोबतही हे फोटो जोडावे लागणार आहेत. असे फोटो लावले नाहीत तर लग्न लागणार नाही असंही सरकारी आदेशात म्हटलं आहे.

सरकारच्या या आदेशामुळे लग्न घरी नवरदेवाला टॉयलेटसमोर जावून आता सेल्फी किंवा फोटो काढावा लागतोय. आत्तापर्यंत 74 जणांनी असे फोटो काढून सरकारला पाठवले आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 11, 2019 06:40 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...