नवी दिल्ली, 20 एप्रिल : मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या हेमंत करकरेंबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर साध्वी प्रज्ञा सिंग यांनी ते वक्तव्य मागे घेत माफी मागून वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर साध्वी प्रज्ञा सिंग यांनी शनिवारी पत्रकार परिषद घेतली.