Home /News /national /

VIDEO : खासदार साध्वी प्रज्ञा सिंह ठाकुर यांची तब्येत बिघडली, कार्यक्रमादरम्यान अचानक आली चक्कर

VIDEO : खासदार साध्वी प्रज्ञा सिंह ठाकुर यांची तब्येत बिघडली, कार्यक्रमादरम्यान अचानक आली चक्कर

भोपाळच्या भाजप खासदार साध्वी प्रज्ञा सिंह ठाकुर यांची अचानक तब्येत बिघडली आहे. याठिकाणी भाजप कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमामध्ये अचानक चक्कर येऊन पडल्याने खळबळ उडाली आहे.

    भोपाळ, 23 जून : भोपाळच्या भाजप खासदार साध्वी प्रज्ञा सिंह ठाकुर यांची अचानक तब्येत बिघडली आहे. भाजप कार्यालयात डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमादरम्यान साध्वी प्रज्ञा यांना अचानक चक्कर आल्याने एकच खळबळ उडाली. याठिकाणी श्यामा प्रसाद मुखर्जी प्रदर्शनाच्या उद्घाटनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्यासह साध्वी प्रज्ञा सिंह ठाकुर त्याठिकाणी उपस्थित होत्या. या कार्यक्रमाचे उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. गेल्या काही दिवसांपासून साध्वी आजारी असल्याचे बोलले जाते. या कार्यक्रमादरम्यान साध्वी अचानक चक्कर येऊन पडल्या, त्यांना कसेबसे कार्यकर्त्यांनी खूर्चीवर बसवले. काही दिवसांपांसून प्रज्ञा सिंह ठाकुर कुणासमोर आल्या नव्हत्या. 30 मे रोजी तसे पोस्टर देखील भोपाळमध्ये लागले होते. त्यानंतर लगेचच दुसऱ्या दिवशी म्हणजे 31  मे रोजी त्यांना दिल्लीतील एम्स रुग्णालयात भरती केल्याचे वृत्त समोर आले होते. सूत्रांच्या माहितीनुसार त्या गेल्या अनेक दिवसांपासून दिल्लीतील रुग्णालयामध्ये भरती होत्या. त्यांनी एका व्हिडीओच्या माध्यमातून सांगितले होते की, त्यांची तब्येत ठीक नाही आहे तसच त्यांना एका डोळ्याने दिसणं बंद झाले आहे. दुसऱ्या डोळ्याने सुद्धा अंधूक, फक्त 25 टक्के दिसत आहे. त्याचप्रमाणे मेंदूपासून रेटिनापासून सूज आहे आणि डॉक्टरांनी प्रज्ञा सिंह यांना बोलण्यास देखील मनाई केल्याची माहिती समोर आली होती. भोपाळमध्ये त्यांच्या गायब होण्याचे पोस्टर लागल्यानंतर त्यांनी ही काँग्रेसची घृणास्पद चाल असल्याचा आरोप केला होता. त्या पुढे म्हणाल्या होत्या की, मी जरी दिल्लीत असले  तरी त्यांची टीम भोपाळमध्ये कार्यरत आहे.
    First published:

    Tags: Sadhavi pragya singh

    पुढील बातम्या