ज्योतिरादित्य शिंदेंचं स्वप्न भंगलं, एमपीमध्ये 'कमल'राज

मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान यांनी राज्यपाल आनंदीबेन पटेल यांच्याकडे आपला राजीनामा सुपूर्त केला होता.

News18 Lokmat | Updated On: Dec 12, 2018 07:09 PM IST

ज्योतिरादित्य शिंदेंचं स्वप्न भंगलं, एमपीमध्ये 'कमल'राज

मध्य प्रदेश, 12 डिसेंबर : पाच राज्यांच्य़ा विधानसभा निवडणुकांच्या निकालानंतर कमलनाथ हेच मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री असणार यावर शिक्कामोर्तब झाला आहे. मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान यांनी राज्यपाल आनंदीबेन पटेल यांच्याकडे आपला राजीनामा सुपूर्त केला होता.

मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा राज्यपालांकडे दिला आहे. स्पष्ट बहुमत नसल्यानं सत्ता स्थापनेचा दावा नाही. शिवराज सिंग चौहान आत्तापर्यंत तिसऱ्यांदा मुख्यमंत्री झाले आहेत. परंतु या विधानसभा निवडणुकीत जनतेचं बहुमत न मिळाल्यानं आता त्यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्याचं ठरवलं.

राजीनामा दिल्यानंतर शिवराज सिंग चौहान यांनी कमलनाथ यांना शुभेच्छा देऊन राजभवनातून निघाले. मध्य प्रदेशमध्ये काँग्रेस हा सर्वात मोठा पक्ष ठरला असला तरीही कोणत्याही पक्षाला तिथं बहुमत मिळालेलं नाही. पण मायावतींनी काँग्रेसला थेट पाठिंबा दिल्याने भाजपच्या उरल्या-सुरल्या आशाही मावळल्या होत्या. त्यामुळे मध्य प्रदेशातही काँग्रेसच सरकार स्थापन करणार, यावर शिक्कामोर्तबच झालं आहे.

मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीत 114 जागा मिळवलेली काँग्रेस बहुमतापासून अवघ्या दोन जागा दूर होतं. अशा स्थितीत बहुजन समाज पक्षाच्या अध्यक्षा मायावती यांनीही काँग्रेसला थेट पाठिंबा जाहीर केला. याबाबत त्यांनी लखनौ इथं पत्रकार परिषद घेतली होती.

दरम्यान, मध्य प्रदेश विधानसभा निवडणूक निकालाचा सस्पेन्स अखेर 24 तासानंतर संपला. या निवडणुकीत 114 जागा मिळवत काँग्रेस हाच सर्वात मोठा पक्ष ठरला. तर भाजपला 109 जागांवर समाधान मानावं लागलं. इतरांच्या खात्यात 7 जागा गेल्या आहेत.

Loading...

मध्य प्रदेश हा वर्षानुवर्ष भाजपचा गड राहिला आहे. पण आता काँग्रेसने हे राज्य हिसकावून घेत भाजपला चांगलाच दणका दिला आहे. भाजप सरकाविरोधातील रोष आणि काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी चिकाटीने केलेला प्रचार हे या सत्ताबदलामागील मुख्य कारण आहे.


VIDEO : नेत्यांची होणार राष्ट्रवादीत घरवापसी, अजित पवारांचा मोठा खुलासा


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 12, 2018 06:58 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...