भाजप भोपाळचा गड राखणार का? 'या' तगड्या उमेदवाराची चर्चा

भाजप भोपाळचा गड राखणार का? 'या' तगड्या उमेदवाराची चर्चा

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार राज्याचे माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांना या मतदारसंघातून उमेदवारी देण्याचा विचार सुरु आहे.

  • Share this:

भोपाळ, 25 मार्च: भाजपचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या भोपाळ लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसने माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह यांना मैदानात उतरवले आहे. काँग्रेसच्या या निर्णयामुळे भाजपने देखील या मतदारसंघातून तगडा उमेदवार देण्याचे ठरवले आहे. विशेष म्हणजे 1989पासून हा मतदारसंघ भाजपकडे आहे. त्यामुळे यंदा देखील विजय मिळवण्याचा भाजपचा प्रयत्न असेल. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार राज्याचे माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांना या मतदारसंघातून उमेदवारी देण्याचा विचार सुरु आहे.

काँग्रेसने दिग्विजय सिंह यांच्या नावाची घोषणा केल्यानंतर साध्वी प्रज्ञा सिंग यांनी दावा ठोकला होता. भाजप आणि संघाने संधी दिली तर भोपाळमधून निवडणूक लढवण्यास उत्सुक असल्याचे त्यांनी म्हटले होते.18 लाख मतदार असलेल्या या मतदारसंघात 4 लाखाहून अधिक मुस्लिम मतदार आहेत. यातील बहुसंख्य मुस्लिम मतदार चौहान यांना पाठिंबा देतात. गेल्या 3 दशकापासून भाजपचा गड असलेल्या हा मतदारसंघ यावेळी देखील कायम राखावा यासाठी पक्ष शिवराज यांच्या नावाचा विचार करत असल्याचे समजते.

भोपाळमधून कोणाला उमेदवारी द्यावी यासंदर्भात अद्याप निर्णय झालेला नाही. पण अंतिम निर्णय दिल्लीतूनच घेतला जाईल, असे भाजप प्रदेशाध्यक्ष राकेश सिंह यांनी सांगितले. भाजपने शिवराज यांना उमेदवारी दिली किंवा नाही तर दिग्विजय यांचा पराभव नक्की असल्याचे सिंह म्हणाले.

कमलनाथ यांची खेळी

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दिग्विजय यांना यंदा त्यांच्या स्वत:च्या म्हणजेच राजगड लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवायची होती. पण कमलनाथ यांनी त्यांना भोपाळ हा विजयी होण्याच्या दृष्टीने अवघड असा मतदारसंघ दिला. दिग्विजय सिंह यांनी राजगड येथून 1984 आणि 1991मध्ये विजय मिळवला होता.

भोपाळ मतदारसंघात विधानसभेच्या 8 जागा येतात. गेल्या नोव्हेंबरमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत या 8 पैकी 3 जागांवर काँग्रेसचे उमेदवार तर 5 जागांवर भाजपचे उमेदवार विजयी झाले होते. दरम्यान राज्य समितीने या मतदारसंघातून भोपाळचे महापौर आलोक शर्मा आणि पक्षाचे सचिव व्ही.डी.शर्मा यांचे नाव सुचवले आहे. पण काँग्रेसने दिग्विजय सिंह यांना मैदानात उतरवल्यानंतर भाजपमधून शिवराज यांचे नाव पुढे येत आहे.

इंदिरा गांधींच्या हत्येनंतर विजय

भोपाळमधून काँग्रेसने 1984मध्ये विजय मिळवला होता. इंदिरा गांधी यांची हत्या झाल्यानंतर काँग्रेसचे के.एन.प्रधान यांनी विजय मिळवला होता. मात्र त्यानंतर गेली 30 वर्षे येथे भाजपची सत्ता आहे. 1989पासून आतापर्यंत झालेल्या 8 निवडणुकीत भाजपने बाजी मारली आहे. 2014च्या निवडणुकीत विद्यमान खासदार आलोक संजर यांनी 3.70 लाखाहून अधिक मतांनी विजय मिळवला होता.

VIDEO: जेव्हा शरद पवारांनी उदयनराजेंची कॉलर उडवली...!

First published: March 25, 2019, 9:29 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading