मध्य प्रदेशमध्ये राजकीय भूकंपाची शक्यता; कमलनाथ सरकार अल्पमतात?

मध्य प्रदेशमध्ये राजकीय भूकंपाची शक्यता; कमलनाथ सरकार अल्पमतात?

देशाची सत्ता कोणाकडे जाणार याची चर्चा सुरु असताना मध्य प्रदेशमध्ये राजकीय भूकंप होण्याची शक्यता आहे.

  • Share this:

भोपाळ, 20 मे: लोकसभा निवडणुकीचे मतदान संपल्यानंतर सर्वांना उत्सुकता आहे ती 23 मेच्या निकालाची. त्याआधी जाहीर झालेल्या एक्झिट पोलनुसार पुन्हा एकदा मोदीच पंतप्रधान होणार असे अंदाज व्यक्त करण्यात आले आहेत. देशाची सत्ता कोणाकडे जाणार याची चर्चा सुरु असताना मध्य प्रदेशमध्ये राजकीय भूकंप होण्याची शक्यता आहे. राज्यातील कमलनाथ यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस सरकार अल्पमतात असल्याचा दावा भाजपने केला आहे. भाजपचे नेते प्रतिपक्ष गोपाल भार्गव यांनी राज्यपालाला पत्र लिहून विधानसभेचे अधिवेशन बोलवण्याची मागणी केली आहे.

देशात आणि राज्यात ज्या पद्धतीने भाजपला पाठिंबा मिळत आहे. त्यामुळे अनके काँग्रेसचे आमदार कमलानाथ सरकारमध्ये कंटाळले असून त्यांना भाजपमध्ये यायचे आहे. भार्गव म्हणाले, भाजपला घोडेबाजार करायचा नाही. पण जर काँग्रेसचे आमदार त्यांच्या सरकारसोबत नाहीत. त्यामुळे राज्यातील कमलनाथ सरकारने त्यांचे बहुमत सिद्ध करावे. राज्यातील सरकारला जनतेने स्विकारलेले नाही. राज्य सरकार त्याच्याच ओझ्या खाली दबून कोसळेल.

राज्य सरकार कोसळेल यासंदर्भात भाजप राष्ट्रीय महासचिव कैलाश विजयवर्गीय यांनी देखील काही दिवासंपूर्वी वक्तव्य केले होते. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर 22 जागा जिंकण्याचा दावा करणारे कमलनाथ 22 दिवस देखील मुख्यमंत्री राहणार नाहीत. सत्तेत आल्यानंतर 10 दिवसात शेतकऱ्यांचे कर्ज माफ केले जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले होते आणि कर्ज माफ नाही झाले तर मुख्यमंत्री बदलला जाईल असे ते म्हणाले होते, याची आठवण विजयवर्गीयन यांनी करुन दिली होती.

भाजपच्या भोपाळमधील उमेदवार साध्वा प्रज्ञासिंग यांनी गोडसे यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यावर विजयवर्गीय यांनी सांगितले की, या प्रकरणी साध्वी यांनी माफी मागितली आहे आणि हे प्रकरण आता संपले आहे.


VIDEO: निकालाआधी कांचन कुल यांची सुप्रिया सुळेंवर टीका, म्हणाल्या...


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 20, 2019 02:19 PM IST

ताज्या बातम्या