दिग्विजय सिंह यांच्या विरोधात भाजप उभं करणार 'ही' उमेदवार?

मालेगाव बाँबस्फोट प्रकरणात आरोपी असणाऱ्या साध्वी प्रज्ञा सिंह यांना भाजप भोपाळमधून उमेदवारी देण्याची शक्यता आहे.

मालेगाव बाँबस्फोट प्रकरणात आरोपी असणाऱ्या साध्वी प्रज्ञा सिंह यांना भाजप भोपाळमधून उमेदवारी देण्याची शक्यता आहे.

  • Share this:
    भोपाळ, 17 एप्रिल : मालेगाव बाँबस्फोट प्रकरणात आरोपी असणाऱ्या साध्वी प्रज्ञा सिंह यांना भाजप भोपाळमधून उमेदवारी देण्याची शक्यता आहे. काँग्रेसचे दिग्गज नेते आणि माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह यांच्या विरोधात भाजपने साध्वी प्रज्ञा सिंह यांना लढवण्याची खेळी भाजपच्या गोटात आखली जात आहे. भाजप नेते शिवराजसिंह चौहान यांना भेटण्यासाठी साध्वी प्रज्ञा भोपाळमध्ये भाजप कार्यालय गाठले, त्याच वेळी त्यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब होणार, अशी चर्चा सुरू झाली. रामलाल, प्रभात झा, शिवराजसिंह चौहान यांच्याशी साध्वी प्रज्ञा यांनी चर्चा केली. साध्वी प्रज्ञा यांच्या उमेदवारीविषयी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आग्रही असल्याचं बोललं जात आहे. मध्य प्रदेशात नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपला पराभवाचा सामना करावा लागला. त्यानंतर लोकसभा निवडणुकीचे उमेदवार देताना भाजप विशेष काळजी घेताना दिसत आहे. कारण, भोपाळच्या जागेवर दिग्विजय सिंह यांच्याविरोधात कुणाला उभं करायचं? यावर पक्षात भरपूर खल झाला.  दिग्विजय सिंह यांना टक्कर देण्यासासाठी माजी मुख्यमंत्री उमा भारती आणि शिवराज सिंह चौहान यांना मैदानात उतवरण्याच्या तयारीत असल्याचीही चर्चा झाली. पण, अद्याप कुणाच्याही नावावर शिक्कामोर्तब झालेलं नाही. झाशीच्या खासदार असलेल्या उमा भारती या निवडणूक लढवण्याकरता फारशा उत्सुक नाहीत. त्यामुळे आता प्रज्ञा सिंह यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे.
    First published: