भोपाळमधून प्रज्ञा ठाकूर यांनी उमेदवारी अर्ज घेतला मागे, भाजपला मोठा दिलासा

मध्य प्रदेशातील भोपाळ लोकसभा मतदारसंघातून पाच जणांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे.

News18 Lokmat | Updated On: Apr 28, 2019 06:57 AM IST

भोपाळमधून प्रज्ञा ठाकूर यांनी उमेदवारी अर्ज घेतला मागे, भाजपला मोठा दिलासा

भोपाळ, 28 एप्रिल : मध्य प्रदेशातील भोपाळ लोकसभा मतदारसंघातून पाच जणांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. यामध्ये प्रज्ञा ठाकूर यांचाही समावेश आहे. पण उमेदवारी अर्ज मागे घेणाऱ्या या भाजपच्या उमेदवार साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर नाहीत तर अपक्ष उमेदवार प्रज्ञा ठाकूर आहेत. साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांना पाठिंबा दर्शवत त्यांनी आपला अर्ज मागे घेतला आहे. यामुळे भाजपला मोठा दिलासा मिळाला आहे.

भाजपनं साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांना तिकीट देऊन भोपाळ लोकसभा मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं आहे. याच जागेवरून अपक्ष उमेदवार प्रज्ञा ठाकूर यांनीही अर्ज भरला होता. एकाच नावाच्या दोन उमेदवारांमुळे मतदारांमध्ये गोंधळ निर्माण होऊन मतं विभागली जाण्याची भीती भाजपनं व्यक्त केली होती.

हा गोंधळ टाळण्यासाठी स्वतः साध्वींनी प्रज्ञा ठाकूर यांचं मन वळवण्यासाठी त्यांना घरी बोलावलं. या भेटीमध्ये साध्वींनी प्रज्ञा ठाकूर यांना आपल्या विरोधात निवडणूक न लढवण्याचं आवाहन केलं. साध्वींनी केलेल्या विनंतीला मान देत ठाकूर यांनी निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेत समर्थनही दर्शवलं. यानंतर साध्वींनी प्रज्ञा ठाकूर यांना भगवी शाल देऊन त्यांचा सन्मानदेखील केला.

वाचा अन्य बातम्या

SPECIAL REPORT : राधाकृष्ण विखेंचं वेट अँड वॉच, पण पुढे काय?

Loading...

VIDEO : पार्थ पवारांचे ते फोटो व्हायरल, नवनीत राणांनी ट्रोलकऱ्यांना सुनावलं

VIDEO : शेलारांनी आता याची नोंद घ्यावी, मनसेचा भाजपवर आणखी एक 'सर्जिकल स्ट्राईक'

SPECIAL REPORT : उदयनराजे, धनंजय मुंडे आणि महाजनांचा काय आहे फिटनेस मंत्रा?

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 28, 2019 06:57 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...