करणी सेनेचा कहर, आपल्याच कार्यकर्त्याची पेटवली कार !

भोपाळमध्ये करणी सेनेच्या कार्यकर्त्यांनी पद्मावत सिनेमाच्या रिलीजविरोधात ठिकठिकाणी जाळपोळ केली

Sachin Salve | Updated On: Jan 25, 2018 07:07 PM IST

करणी सेनेचा कहर, आपल्याच कार्यकर्त्याची पेटवली कार !

25 जानेवारी : पद्मावत चित्रपटाविरोधात करणी सेना देशभरात धुडगूस घालत आहे. भोपाळमध्ये करणी सेनेच्या कार्यकर्त्यांनी एक कार पेटवून दिली. पण, गमंतीची गोष्ट म्हणजे ही कार करणी सेनेच्याच कार्यकर्त्याची होती.

भोपाळमध्ये करणी सेनेच्या कार्यकर्त्यांनी पद्मावत सिनेमाच्या रिलीजविरोधात ठिकठिकाणी जाळपोळ केली. शहरातील ज्योती टाॅकिजसमोर काही उत्साही कार्यकर्त्यांनी एक लाल रंगाची स्विफ्ट कार पेटवून दिली. थोड्यावेळ्याने लक्षात आले की, ही कार करणी सेनेचे कार्यकर्ते सुरेंद्र सिंह चौहान यांची होती.

अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेऊन कारला लागलेली आग आटोक्यात आणली. मात्र, अग्निशमन दल पोहोचण्याआधी कार जळून खाक झाली होती. या प्रकरणी 2 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jan 25, 2018 07:07 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...

Live TV

News18 Lokmat
close