S M L

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे राष्ट्रपित्यांसारखेच, भाजपच्या नेत्याची मुक्ताफळं

'पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या व्हिजनचा हा विजय आहे आणि मोदी हेही देशासाठी राष्ट्रपित्यासारखचं काम करताहेत.'

News18 Lokmat | Updated On: May 24, 2019 09:42 PM IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे राष्ट्रपित्यांसारखेच, भाजपच्या नेत्याची मुक्ताफळं

भोपाळ 24 मे : भाजपला मिळालेल्या ऐतिहासिक विजयाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे शिल्पकार आहेत. भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच एखाद्या बिगर काँग्रेस नेत्याला एवढं प्रचंड यश मिळालंय. त्यामुळे नरेंद्र मोदी यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होतोय. भाजपचे नेते आणि पश्चिम बंगालचे प्रभारी कैलास विजयवर्गीय यांनी मोदींचं कौतुक करताना मुक्ताफलं उधळलीय. त्यांनी मोदींना चक्क राष्ट्रपित्याचीच उपमा देऊन टाकली.

भोपाळमधून पराभूत झालेले काँग्रेसचे उमेदवार दिग्विजय सिंग यांनी प्रतिक्रिया देताना राष्ट्रपित्याची हत्या करणाऱ्या विचारधारेचा हा विजय असल्याचं म्हटलं होतं. त्याला उत्तर देताना विजयवर्गीय म्हणाले, महात्मा गांधी हे देशाचे राष्ट्रपिता आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या व्हिजनचा हा विजय आहे आणि मोदी हेही देशासाठी राष्ट्रपित्यासारखचं काम करताहेत.

दिग्विजय सिंग यांनी विजय मिळाल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं अभिनंदन केलं हे चांगलं झालं मात्र त्यांचं अभिनंदन करण्याची संधी आम्हाला मिळाली नाही असंही ते म्हणाले.


मध्य प्रदेशातले 'मिर्ची बाबा' गेले कुठे?

भोपाळमध्ये साध्वी प्रज्ञासिंग ठाकूर यांनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजयसिंग यांचा पराभव केला. मध्य प्रदेशातली ही लढत देशभर चांगलीच गाजली. या निवडणुकीच्या प्रचारासाठी दिग्विजयसिंग यांनीही साधू संतांची फौज प्रचारात उतरवली होती. दिग्विजय सिंग हरले आणि साध्वी जिंकल्या तर मी जल समाधी घेईन अशी घोषणा कायम चर्चेत राहणाऱ्या मिर्ची बाबांनी केली होती. मतमोजणीनंतर साध्वी प्रज्ञा जिंकल्याचं जाहीर झालं आणि मिर्ची बाबा गायब झाले. तुमच्या प्रतिज्ञेचं काय करणार आहात असं आता लोक त्यांना विचारत आहेत.

साध्वी प्रज्ञासिंग यांच्या प्रचारासाठी अनेक साधू, संत, महंत प्रचारात सक्रिय झाले होते. त्याला उत्तर देण्यासाठी दिग्विजय सिंग यांनीही अनेक साधूंना प्रचारात उतरवलं. कॉम्प्युटर बाबा, मिर्ची बाबा असे अनेक तथाकथीत बाबा बुवा प्रचारात उतरले आणि त्यांनी आपापल्या पद्धतीने तांत्रिक अनुष्ठान करत दिग्विजय सिंग यांच्या विजयाचा संकल्प सोडत प्रसिद्धी मिळवून घेतली.

Loading...

मिर्ची बाबा यांनी तर एक यज्ञ करत त्यात तब्बल पाच क्विंटल मिरच्यांची आहुती टाकली. दिग्विजय सिंग हरले तर मी जलसमाधी घेऊन अशी घोषणा त्यांनी केली होती. पण निकाल लागल्यानंतर मिर्ची बाबांना जोरदार ठसका लागलाय. ते गुरुवारपासून 'नॉट रिचेबल' आहेत. सगळे त्यांची प्रतिक्रिया घेण्यासाठी उत्सुक आहेत. मात्र बाबांची कुठे समाधी लागली हे कुणालाच कळले नाही.

पाच क्विंटल मिर्च्या, यज्ञ, मंत्र-तंत्र अशी शो बाजी करणाऱ्या या बाबाने प्रचाराच्या काळात प्रसिद्धी मिळवून घेतली. मोठ मोठ्या घोषणा केल्या. आत मात्र या साधूच्या तोंडचं पाणीच पळालंय. बाबा नेमके कुठे आहेत असा आता सगळे प्रश्न विचारत आहेत.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 24, 2019 09:42 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

Live TV

News18 Lokmat
close