भोपाळ, 18 मार्च : रेल्वे प्रवासादरम्यान प्रवाशांना सामान्यत: चांगल्या दर्जाचं अन्न आणि पेये मिळतील का, याची काळजी असते. प्रवाशांची ही समस्या लक्षात घेऊन भारतीय रेल्वेनं (Indian Railway) खानपान व्यवस्था सुधारण्याचा निर्णय घेतला. याअंतर्गत पश्चिम मध्य रेल्वेच्या भोपाळ रेल्वे स्थानकावर (Bhopal Railway) ‘ऑन पेमेंट टी’ ही नवीन सुविधा सुरू करण्यात आली आहे. विशेष म्हणजे प्रवाशांना उत्तम चहा (Good Quality Tea) देण्याचं काम उच्चशिक्षित मुली करत आहेत.
हे वाचा - DRDO ने विक्रमी 45 दिवसांत उभारली बहुमजली इमारत, प्रगत फायटर जेट इथं तयार होणार
सेन्सर मशीन सांगतं, चहा दर्जेदार आहे काय
रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितलं की, ऑन-पेमेंट चहा प्रणालीमध्ये मशीनद्वारे चहाचा दर्जा तपासला जातो. विक्रेत्या मुली जो चहा बनवतात, तो या मशीनमध्ये तपासला जातो. चहाचा दर्जा काय आहे, हे मशीन सेन्सरनं केलेल्या चाचणीत सांगतं.
हे वाचा - पाकिस्तानी माजी पंतप्रधान मुशर्रफना भेटला Sanjay Dutt ; Viral फोटो खरा का?
सुशिक्षित मुली न डगमगता काम करतात
सामान्यतः केटरिंगचे मोठे कंत्राटदार मोठी रक्कम जमा करून रेल्वे स्टेशन आणि पॅंट्री कारवर सेवा देतात. मात्र भोपाळमधील फोन ट्रेन टी साठी रेल्वे अधिकाऱ्यांनी एका कंपनीमार्फत या मुलींना काम सोपवलंय. B.Tech आणि इतर व्यावसायिक पदवी घेणाऱ्या मुली हे काम बिनदिक्कतपणे करत आहेत, हे लक्षात घेण्यासारखं आहे. यापूर्वी रेल्वे स्थानकावर रसायनमिश्रित दूध तयार करून चहा विकण्याचे प्रकार समोर आले आहेत. त्याचबरोबर इतर शहरांतूनही चांगल्या दर्जाचा चहा मिळत नव्हता. पश्चिम रेल्वेचं हे नवं पाऊल प्रवाशांना उत्तम केटरिंग सेवा देण्यासाठी उल्लेखनीय तर ठरेलच. शिवाय, ते रेल्वे व्यवस्थापनाची प्रतिमा सुधारण्यातही महत्त्वाचं ठरेल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bhopal News, Indian railway, Tea