हनी ट्रॅप : नेते आणि अधिकाऱ्यांचे खासगी क्षण लिपस्टीक आणि चश्म्यात व्हायचे कैद

मध्य प्रदेशात हनी ट्रॅपमध्ये अडकलेल्या नेते आणि अधिकाऱ्यांना ब्लॅकमेल करत कोट्यवधी रुपये उकळण्याचा प्रयत्न करण्यात आला.

News18 Lokmat | Updated On: Oct 1, 2019 12:36 PM IST

हनी ट्रॅप : नेते आणि अधिकाऱ्यांचे खासगी क्षण लिपस्टीक आणि चश्म्यात व्हायचे कैद

भोपाळ, 01 ऑक्टोबर : मध्य प्रदेशातील हनी ट्रॅप स्कँडलनं देशाच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. नेते आणि अधिकाऱ्यांना प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्यांना ब्लॅकमेल करणाऱ्या या गँगने त्यांच्याकडून कोट्यवधी रुपये उकळल्याचं समोर आलं होतं. या गँगने नेते आणि अधिकाऱ्यांसोबतचा व्हिडिओ शूट करण्यासाठी लिपस्टिक कव्हर आणि चष्म्यात कॅमेरा बसवला होता. पोलिसांनी सांगितले की, हेच व्हिडिओ दाखवून गँगने नेते आणि अधिकाऱ्यांना ब्लॅकमेल केलं.

याप्रकरणी अभियंत्याने केलेल्या तक्रारीनंतर सर्व प्रकार उघडकीस आला होता. त्यानंतर पाच महिलांसह सहा जणांना ताब्यात घेण्यात आलं होतं. हनी ट्रॅपमध्ये अडकल्यानंतर ब्लॅकमेल करून इंजिनिअरकडे संबंधित महिलांना तीन कोटी रुपयांची मागणी केली होती.

पोलिसांनी अभियंत्याच्या तक्रारीनंतर इंदौर आणि भोपाळ इथून पाच महिलांना ताब्यात घेतलं आहे. यामध्ये आरती दयाल, मोनिका यादव, श्वेता विजय जैन, श्वेता स्वप्निल जौन, बरका सोनी यांचा समावेश आहे. त्यांना कलम 405/19, 419, 420, 384, 506, 120-बी आणि 34 अंतर्गत अटक करण्यात आली. याशिवाय वाहन चालक ओमप्रकाश कोरी नावाच्या पुरुषालाही पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

इंदौरच्या वरिष्ठ पोलिसांनी माहिती दिली की, गँगने ब्लॅकमेल करून पैसे उकळले. त्यासोबतच वेगवेगळ्या मागण्या जबरदस्तीने पूर्ण करून घेतल्याचा संशयही तपास अधिकाऱ्यांना येत आहे. आपलं सावज हेरल्यानंतर त्याचे खासगी क्षण लपवलेल्या कॅमेऱ्याने टिपले जात होते. त्यानंतर व्हिडिओ दाखवून ब्लॅकमेल केलं जात असे असंही पोलिसांनी सांगितले.

हनी ट्रॅपमधील अनेकांचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. यातील काही व्हिडिओमध्ये छेडछाड झाल्याचं समजते. याबद्दल पोसिसांनी कोणतीही माहिती दिलेली नाही.

Loading...

पुणे-मुंबई एक्सप्रेस वेवर ट्रकने घेतला पेट; आगीची भीषणता दाखवणारा VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: bhopal
First Published: Oct 1, 2019 12:36 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...