'मुसलमान नंतर आधी सरकारी कर्मचारी'; अतिक्रमणाविरोधी कारवाई थांबवण्याचा दबाव आल्यावर अधिकाऱ्याचं बाणेदार उत्तर

'मुसलमान नंतर आधी सरकारी कर्मचारी'; अतिक्रमणाविरोधी कारवाई थांबवण्याचा दबाव आल्यावर अधिकाऱ्याचं बाणेदार उत्तर

'तुम्हीही मुस्लीम आहात, मग मुसलमान दुकानदारांवर तरी कारवाई थांबवा', असं सांगणाऱ्यांना एका सरकारी अधिकाऱ्याने सडेतोड प्रत्युत्तर दिलं..

  • Share this:

भोपाळ, 12 मे : आपल्या देशात कुठल्याही कारणाने कारवाईसाठी किंवा कार्यवाहीसाठी मध्येच धर्म, जात, पंथ आणायची एक वाईट सवय समाजाला आहे. 'तुम्हीही मुस्लीम आहात, मग मुसलमान दुकानदारांवर तरी कारवाई थांबवा', असं सांगणाऱ्यांना एका सरकारी अधिकाऱ्याने सडेतोड प्रत्युत्तर दिलं. या कर्तव्यतत्पर सरकारी अधिकाऱ्याचं आता कौतुक होत आहे. माजी नगरसेवकानेच धर्माचं नाव घेत कारवाई न करण्याचा फोन केल्यावरही अधिकाऱ्याने योग्य उत्तर देत कर्तव्य बजावलं.

भोपाळ महानगरपालिकेच्या हद्दीत ही घटना घडली. (Bhopal municipal Corporation)  अतिक्रमणाविरोधातील कारवाईवरून माजी नगरसेवक असलेले शाहवर मन्सूरी इतके संतप्त झाले की त्यांनी अधिकाऱ्याला फोन करून अपशब्द वापरले. अतिक्रमणविरोधी मोहीम राबविणारे अधिकारी नासीर खान हे मुस्लीम (Muslim) असल्याचं सांगून ते मुस्लीम दुकानदारांवर कारवाई करू नये यासाठी दबाव आणत होते. हिंदू-मुस्लीमांविषयी बोलत विनाकारण धार्मिक भाष्य केल्यानं नासिर यांनी त्यांना योग्य उत्तर दिले. नासीर म्हणाले की, 'मी मुसलमान आहे, पण प्रथम सरकारी कर्मचारी आहे आणि कारवाई थांबणार नाही.'

'तुम्हीही मुस्लीम आहात ...'

भास्करने दिलेल्या बातमीनुसार, माजी नगरसेवक मन्सूरी यांनी आपण सरकारी अधिकाऱ्याला फोन केल्याचं मान्य केलं आहे. " होय, मी नासीर यांना फोन केला होता. लॉकडाऊन दरम्यान अतिक्रमण हटवण्यासारखी कारवाई होऊ नये, असे कोर्टाचे आदेश आहेत, हे त्यांना सांगितलं. त्यानंतरही नासिर आपल्या पथकासोबत तिथे आले. त्यावर मी इतकेच बोललो की, रमजान आहे. तुम्हीही मुस्लीम आहात यात काय चुकीचं आहे. लोक कोरोनामुळे अगोदरच अस्वस्थ आहेत, त्यांना आणखीन त्रास देणं चुकीचं आहे. मी आयुक्तांशीही बोललो आहे", असं मन्सूरी म्हणाले.

हे वाचा - पहिला डोस मिळताना मुश्किल आणि भारतीय तज्ज्ञ म्हणतायेत कोरोना लशीचा तिसरा डोसही घ्यावा लागेल

मंगळवारी तीन दिवसांपासून महानगरपालिकेचे पथक नवबहार सबझी मंडीतील अतिक्रमणाविरोधात कारवाई करीत आहे. नवबहार भाजी मंडई करोंडला शिफ्ट झाली आहे. यानंतरही येथे भाजीपाला व्यापार करणे अवैध आहे. कर्फ्यूनंतरही दुकानदार येथे व्यवसाय करतच राहिले. यामुळे महापालिकेच्या अतिक्रमण कर्मचार्‍यांनी येथे कारवाई सुरू केली आहे. प्रशासनाच्या कडक कारवाईचा विचार करता व्यापारी नेते फेऱ्या मारू लागले आहेत. यानंतर शाहवर मन्सुरीने धर्माची मदत घेत होणारी कारवाई थांबविण्याचा प्रयत्न केला.

हे वाचा - एकच मास्क सतत वापरत असाल तर सावधान! ओल्या आणि दमट मास्कमुळेही वाढतो जीवघेण्या काळ्या बुरशीचा धोका

कारवाईबाबत आमदारांनीही केली आहे टीका

नगरसेवकांच्या आक्षेपानंतर भोपाळ येथील आमदार आरिफ मसूदही नवबहार भाजी मंडईतील महापालिकेच्या अतिक्रमणाच्या कारवाईच्या निषेधार्थ आंदोलनात उतरले आहेत. माहिती देताना ते म्हणाले की, महापालिकेने केलेल्या तोडफोडीच्या प्रक्रियेसंदर्भात मंत्री भूपेंद्र सिंह आणि भोपाळ महानगरपालिका आयुक्त यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली. त्यांना पत्र लिहून दोषी कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

Published by: News18 Desk
First published: May 12, 2021, 10:18 PM IST

ताज्या बातम्या