निवडणूक आयोगाचा दणका, साध्वी प्रज्ञासिंह यांच्या विरुद्ध FIR दाखल

मध्य प्रदेशमधील भोपाळ लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणाऱ्या भाजपच्या उमेदवार साध्वी प्रज्ञासिंह यांना निवडणूक आयोगाने दणका दिला आहे.

News18 Lokmat | Updated On: Apr 22, 2019 09:26 PM IST

निवडणूक आयोगाचा दणका, साध्वी प्रज्ञासिंह यांच्या विरुद्ध FIR दाखल

भोपाळ, 22 एप्रिल: मध्य प्रदेशमधील भोपाळ लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणाऱ्या भाजपच्या उमेदवार साध्वी प्रज्ञासिंह यांना निवडणूक आयोगाने दणका दिला आहे. वादग्रस्त विधान केल्याप्रकरणी आयोगाने त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. भोपाळच्या जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी हे आदेश दिले आहेत. साध्वी यांनी बाबरी मस्जिद प्रकरणी एक वादग्रस्त विधान केले होते.



एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं की, 'निश्चित स्वरूपात राम मंदिर बांधण्यात येणार असून हे एक भव्य मंदिर असेल.' यानंतर मंदिर उभारण्यासाठीच्या वेळमर्यादेबाबतही त्यांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावर प्रज्ञा यांनी सांगितले की, 'आम्ही मंदिर बांधणार. शेवटी (बाबरी मस्जिद)ढाचा उद्ध्वस्त करण्यासाठी आम्हीच तेथे गेलो होतो'.



साध्वींनी केलेल्या विधानावर आयोगाने त्यांना नोटीस बजावली होती. त्यांनी दिलेल्या उत्तरावर आयोगाचे समाधन न झाल्याने गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.

साध्वी प्रज्ञा यांनी बाबरी मस्जिदसंदर्भात आपल्या भूमिकेवर प्रकाश टाकत म्हटलं की, ' मी बाबरी मशिदीवर चढून ती पाडण्यासही मदत केली होती. मी चढाई करून ढाचा तोडला. हे काम करण्यासाठी देवानं मला संधी दिली, याचा मला अभिमान आहे. मला शक्ती मिळाली आणि मी ते काम पूर्ण केलं. आता त्याच जागेवर राम मंदिर उभारणार.


SPECIAL REPORT : राज ठाकरेंना जशास तसे उत्तर, लावा रे तो व्हिडिओ!


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 22, 2019 09:04 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...

Live TV

News18 Lokmat
close