खळबळजनक आरोप; 'भाजप पाकिस्तानच्या ISI कडून पैसे घेत आहे'

खळबळजनक आरोप; 'भाजप पाकिस्तानच्या ISI कडून पैसे घेत आहे'

काँग्रेसचे नेते आणि मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त विधान केले आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 01 सप्टेंबर: काँग्रेसचे नेते आणि मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त विधान केले आहे. सिंह यांच्या या विधानामुळे आता राजकीय वाद सुरू होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. शनिवारी एका कार्यक्रमात दिग्विजय सिंह यांनी भाजपवर आतापर्यंतचा सर्वात गंभीर आणि खळबळजनक असा आरोप केला. सिंह यांच्या या आरोपामुळे ते पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.

भारतीय जनता पक्ष आणि बजरंग दल पाकिस्तानची गुप्तचर यंत्रणा इंटर सर्व्हिसेस इंटेलिजेंस अर्थात ISIकडून पैसे घेत आहे. विशेष म्हणजे मुस्लिमांपेक्षा गैर मुस्लिम लोक पाकिस्तानच्या ISIसाठी हेरगिरी करत आहेत. ही गोष्ट आपण समजून घेतली पाहिजे. सिंह यांनी या केलेल्या या वक्तव्यानंतर अनेक प्रतिक्रिया येत आहेत. त्यांनी याआधीही भाजप आणि केंद्र सरकारवर गंभीर असे आरोप केले आहेत. आता थेट त्यांनी भाजपवर पाकिस्तानकडून पैसे घेत असल्याचा गंभीर आरोप केला आहे.

भींड जिल्ह्यातील एका कार्यक्रमात बोलताना सिंह यांनी देशाच्या अर्थव्यवस्थेवरून देखील मोदी सरकारवर हल्ला चढवला. या सरकारमुळे देशाची अर्थव्यवस्था बिघडली आहे. बेरोजगारी वाढत आहे. नव्या नोकऱ्या मिळत नाहीत. सरकार स्वत:चे अपयश लपवण्यासाठी RBIकडून पैसे घेऊन काम करत आहे. अशा परिस्थितीत सरकारने सध्या सर्व कामे सोडून देशाच्या अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी लक्ष दिले पाहिजे, असे सिंह म्हणाले.

केवळ सिंहच नाही तर देशाचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी सुद्धा अर्थव्यवस्थेच्या बिकट परिस्थितीवर मोदी सरकारला सल्ला दिला आहे.

VIDEO: महिला बस चालकाचा इंगा! मुलींना छेडणाऱ्याला फिल्मी स्टाईलनं मारहाण

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 1, 2019 04:06 PM IST

ताज्या बातम्या