मराठी बातम्या /बातम्या /देश /

मध्य प्रदेशमध्ये काँग्रेसची पहिली विकेट पडली, आमदाराने राजीनामा दिल्याने सरकारला धक्का

मध्य प्रदेशमध्ये काँग्रेसची पहिली विकेट पडली, आमदाराने राजीनामा दिल्याने सरकारला धक्का

काँग्रेसचे नेते कमलनाथ यांनी गेल्या वर्षी त्यांची संपत्ती 206 कोटी इतकी असल्याचं सांगितलं होतं. मुख्यमंत्री असल्यानं त्यांचा कर सरकार भरते.

काँग्रेसचे नेते कमलनाथ यांनी गेल्या वर्षी त्यांची संपत्ती 206 कोटी इतकी असल्याचं सांगितलं होतं. मुख्यमंत्री असल्यानं त्यांचा कर सरकार भरते.

मध्य प्रदेशमध्ये सुरू असलेल्या राजकीय उलथापालथेच्या चर्चेनं आणखीनच जोर पकडला आहे.

  • Published by:  Akshay Shitole

भोपाळ, 5 मार्च : मध्य प्रदेशमध्ये राजकीय घमासान सुरू असतानाच आता सत्ताधारी काँग्रेसला धक्का बसला आहे. कारण काँग्रेसच्या एका विद्यमान आमदाराने राजीनामा दिला आहे. सुवासरा येथील काँग्रेस आमदार हरदीप सिंह डंग यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. त्यामुळे आधीच मध्य प्रदेशमध्ये सुरू असलेल्या राजकीय उलथापालथेच्या चर्चेनं आणखीनच जोर पकडला आहे.

'सरकारमधील अनेक मंत्री आणि विशेषत: मुख्यमंत्र्यांकडून होत असलेल्या अन्यायामुळे मी हा राजीनामा देत आहे,' असा खुलासा हरदीप सिंह डंग यांनी केला. हरदीप सिंह डंग यांच्यावर काँग्रेसने याआधीच भाजप नेत्यांशी संपर्क ठेवल्याचा आरोप केला होता. अशातच त्यांनी आता राजीनामा दिल्यानंतर ही भाजपचीच खेळी असल्याचं बोललं जाऊ लागलं आहे.

दरम्यान, मध्य प्रदेशातील कमलनाथ सरकारवर मोठं संकट आल्याची चर्चा आहे. काँग्रेसचे मोठे नेते आणि आदिवासी आमदार बिसाहुलाल सिंग यांच्यासह सुमारे आठ आमदार भाजपा नेत्यांसमवेत गुरुग्राममधील हॉटेलमध्ये असल्याची बोललं जात होतं. काँग्रेसच्या आमदारांसह बसपाचे आमदार रामबाई हेदेखील हॉटेलमध्ये गेल्याचा आरोप करण्यात आला होता.

काँग्रेसच्या आमदारांना केलं बंधक - दिग्विजय सिंह

काँग्रेसचा आरोप आहे की, आमदार बिसाहुलाल यांच्यासह काँग्रेसचे अनेक आमदार भाजप नेत्यांसह ओलीस ठेवले आहेत. भाजप आमदारांचा घोडेबाजार करत असल्याचा आरोप काँग्रेसकडून करण्यात आली आहे. दिग्विजय सिंह यांनी भाजपवर सरकार अस्थिर करण्याचा आरोप केला.

हेही वाचा- 'अरे दम असेल तर घुसून दाखव', भाजप नेत्याने चक्क 'कोरोना'लाच दिलं चॅलेंज

या राजकीय नाटकाच्या प्रकरणात एएनआयने दिग्विजय सिंह यांचा हवाला दिला आहे. दिग्विजय सिंह म्हणाले की, 'जेव्हा आम्हाला कळलं की जीतू पटवारी आणि जयवर्धन सिंह यांना तिथे (मानेसरचे हॉटेल) पाठविण्यात आलं. ज्या लोकांच्या आम्ही संपर्कात होतो ते आमच्याकडे परत येण्यास तयार होते. बिसाहुलाल आणि रामबाई यांच्याशी आम्ही कायम संपर्कात होतो. भाजपाने त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला तेव्हाही रामबाई परत आल्या होत्या.

राज्यसभा निवडणुकीपूर्वी राजकीय नाटक

राज्याच्या कोट्यातून राज्यसभेच्या तीन जागांच्या गदारोळ सुरू आहे. सध्या विधानसभेत 228 सदस्य आहेत. दोन आमदारांच्या निधनानंतर दोन जागा रिक्त आहेत. सध्या काँग्रेसकडे 114, भाजपकडे 107 आमदार आहेत. उर्वरित नऊ जागांपैकी दोन जागा बसपाकडे आहेत तर सपाचे एक आमदार आहेत. त्याचवेळी विधानसभेत चार अपक्ष आमदार असून भाजपचं लक्ष काँग्रेसच्या नाराज आमदारांवर आहे. हेच कारण आहे की, मंत्रिपदाची जागा न मिळाल्याबद्दल रागावलेल्या आदिवासी आमदार बिसाहुलाल यांच्यासह अन्य आमदारांवर भाजपची नजर आहे, परंतु काँग्रेसचे आमदार साथ सोडणार नसल्याचं बोललं जात आहे.

First published:

Tags: Bhopal, Congress, Madhya pradesh