सत्तेत आल्यावर संघाच्या शाखांवर बंदी आणू, काँग्रेसचं आश्वासन

सत्तेत आल्यावर संघाच्या शाखांवर बंदी आणू, काँग्रेसचं आश्वासन

मध्यप्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. या जाहीरनाम्याला काँग्रेसने 'वचनपत्र' असे नाव दिले आहे.

  • Share this:

मकरंद काळे, प्रतिनिधी

मध्यप्रदेश,11 नोव्हेंबर : मध्यप्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. या जाहीरनाम्याला काँग्रेसने 'वचनपत्र' असे नाव दिले आहे. शनिवारी भोपाळमध्ये प्रदेश काँग्रेसच्या मुख्यालयात जाहीरनामा जाहीर करण्यात आला. विशेष म्हणजे या जाहीरनाम्यात काँग्रेसने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखांवर बंदी आणण्याचं आश्वासन दिलं आहे. काँग्रेसच्या आश्वासनानंतर मध्यप्रदेशमध्ये राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.

काँग्रेसच्या जाहीरनाम्यात म्हटलंय की, "शासकीय परिसरात संघांच्या शाखांवर बंदी आणण्यात येईल. शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना शाखेत जाण्यापासून मुक्त करण्यात येईल." काँग्रेसच्या या आश्वासनानंतर भाजपने आक्षेप घेतलाय.

भाजपचे प्रवक्ते रजनीश अग्रवाल यांनी काँग्रेसला प्रत्युत्तर दिलंय. काँग्रेस संघाच्या नावावर फक्त अल्पसंख्यांक आणि इतर लोकांमध्ये अपप्रचार करत आहे अशी टीका अग्रवाल यांनी केली. तसंच काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी जिथे जातात तिथे देश विरोधात घोषणाबाजी होते अशी टीकाही त्यांनी केली.

विशेष म्हणजे, काँग्रेसने मध्यप्रदेशसाठी आपल्या जाहीरनाम्यात व्यापम घोटाळ्यातील परिक्षांमध्ये गेल्या १० वर्षातील उमेदवारांचे शुल्क परत करण्याचं आश्वासनही काँग्रेसने आपल्या जाहीरनाम्यात दिलं आहे. तसंच व्यापम बंद करून टाकू असंही काँग्रेसने सांगितलंय.

=======================

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 11, 2018 06:29 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading