News18 Lokmat

आयोगाच्या निर्णयाचा फटका, 100 जणांना मुलीचे कन्यादान करता येणार नाही!

या निर्णयामुळे जवळ जवळ 100 जणांना आपल्या मुलीचे कन्यादान करता येणार नाही.

मनोज राठोड मनोज राठोड | News18 Lokmat | Updated On: Apr 24, 2019 05:55 PM IST

आयोगाच्या निर्णयाचा फटका, 100 जणांना मुलीचे कन्यादान करता येणार नाही!

भोपाळ, 24 एप्रिल: देशात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. आचार संहिता लागू असल्याने अनेक कामे थांबली आहेत. अशातच निवडणूक आयोगाने दिलेल्या एका निर्णयामुळे खळबळ उडाली आहे. या निर्णयामुळे जवळ जवळ 100 जणांना आपल्या मुलीचे कन्यादान करता येणार नाही.

लोकसभा निवडणुकीसोबत देशात लग्न सराईचे दिवस आहेत. निवडणुकीच्या काळात प्रशासनासंदर्भातील अनेक निर्णय घेण्याचे अधिकार आयोगाकडे असतात. अशाच एका निर्णयाचा फटका तुरुंगातील कैद्यांना बसला आहे. आयोगाने राज्यातील सर्व कैद्यांना पॅरोल देण्यास मनाई केली आहे. आता आयोगाच्या या निर्णयामुळे 100 कैद्यांना मुलांच्या लग्नासाठी जाता येणार नाही. यातील सर्वात मोठी अडचण म्हणजे ज्याच्या मुलींचे विवाह ठरले आहेत. त्यांना मुलींचे कन्यादान करता येणार नाही.

आयोगाच्या या निर्णयामुळे ज्यांनी पॅरोलसाठी अर्ज केले आहेत त्यांची सुट्टी रद्द करण्यात आली आहे. आता या वडीलांसमोर प्रश्न पडला आहे का त्यांच्या मुलांचे कन्यादान कसे करायचे. उत्तर प्रदेशमध्ये 130 तुरुंग आहेत. या सर्व तुरुंगात मिळून 18 हजार कैदी आहेत. त्यापैकी 4 हजार जणांना प्रत्येक वर्षी पॅरोल दिला जातो. भोपाळ सेंट्रल जेलचा विचार केल्यास येथे अनेक कैदी आहेत ज्यांचा मुलीच्या कन्यादानासाठी जायचे आहे. यातील एक कैदी असलेला समीमच्या मुलीचा विवाह 26 एप्रिल रोजी शाजापूर येथे होणार आहे. पण आयोगाच्या निर्णयामुळे त्याला आता सुट्टी मिळणार नाही. सलमी एका हत्येच्या प्रकरणात शिक्षा भोगत आहे.

या सर्व कैद्यांना आधी तुरुंग प्रशासनाने पॅरोल मंजूर केली होती. पण आता आयोगाच्या आदेशामुळे ती रद्द करण्यात आली आहे. राज्यात असे एकूण 100 कैदी आहेत ज्यांना मुलाच्या अथवा मुलीच्या लग्नासाठी जायचे आहे. यासंदर्भात बोलताना भोपाळ सेंट्रल जेलचे अधिक्षकांनी सांगितले की, ज्या कैद्यांनी पॅरोलसाठी अर्ज केले आहेत. त्यांचे अर्ज आयोगाकडे परवानगीसाठी पाठवण्यात आले आहेत. आयोगाने जर परवानगी दिली तर त्यांना सुट्टी दिली जाईल.


Loading...

VIDEO : गौरीचं नाव घेतो पुन्हा येणार राष्ट्रवादी सरकार, नवरदेवाचा उखाणा व्हायरल


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 24, 2019 05:55 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...