कोरोनाशी लढून देशाला वाचवायचं आहे! आईच्या दफनविधीनंतर 2 तासात अशरफ परतला कामावर

कोरोनाशी लढून देशाला वाचवायचं आहे! आईच्या दफनविधीनंतर 2 तासात अशरफ परतला कामावर

आईच्या मृत्यूनंतरही कोरोनाशी लढण्यासाठी एक कर्मचारी त्याच्या कामावर रुजू झाला. त्याच्या या कामाला लोक सलाम करत आहेत.

  • Share this:

भोपाळ, 27 मार्च : कोरोनाचा देशभरात वेगानं प्रादुर्भाव वाढला आहे. मध्यप्रदेशात गुरुवारी कोरोनामुळे आणखी एकाचा मृत्यू झाला. त्या रुग्णावर एमआरटीबी रुग्णालयात उपचार सुरु होते. राज्यात आतापर्यंत 26 लोकांना कोरोना झाल्याचं समोर आलं आहे. दरम्यान, मध्यप्रदेशातील एका कर्मचाऱ्याची चर्चा सुरु आहे. कोरोनाला रोखण्यासाठी तो काम करत आहे. शहरात सॅनिटायझेशनची जबाबदारी त्याच्यावर आहे.

भोपाळमधील अशरफ अली यांच्या आईचे बुधवारी सकाळी निधन झाले. आईवर दुपारच्या सुमारास अंत्यसंस्कार केल्यानंतर दोन तासातच संध्याकाली अशरफ अली त्यांच्या कामावर रूजू झाले. याची माहिती अधिकाऱ्यांना होताच त्यांनी अशरफला घरी जाण्यास सांगितलं पण त्याने नम्रपणे नकार दिला.

अशरफ म्हणाला की, माझी आई या जगातून गेली आहे. आता देशाला वाचवायचं आहे आणि त्यासाठी काम कऱणं गरजेचं वाटलं. सकाळी 8 वाजता मला समजलं आणि मी दोन वाजता पोहोचलो. मी वाटेतच असताना मला ही बातमी समजली. मला घरचे लोक ओरडलेसुद्धा पण काम हे शेवटी काम आहे. ती आई होती. आज देश आहे त्याची जबाबदारीही माझी आहे.

हे वाचा : संचारबंदीमुळे वेळेत गावी पोचला नाही मुलगा, उपचाराअभावी विझली वडिलांची प्राणज्योत

शहरात महापालिकेच्या 10 ते 12 गाड्या दररोज दोन शिफ्टमध्ये काम करतात. दररोज जवळपास 5 ते 7 हजार घरांना सॅनिटाइझ केलं जातं. यासाठी सकाळी 6 वाजल्यापासून 2 हजार कर्मचारी मास्क, ग्लोव्हज घालून रस्त्यावर उतरतात. कोरोनाशी लढण्यासाठी लोक घरात बंद आहेत. मात्र असे अनेक लोक आहेत जे त्या बंद लोकांपर्यंत कोरोना पोहोचू नये याची काळजी घेण्यासाठी स्वत: रस्त्यावर आहेत.

हे पाहा : हॉस्पिटल, व्हेंटिलेटर ते कोट्यवधी रुपये, कोरोनाविरोधात उद्योगपतींची मोठी मदत

First published: March 27, 2020, 6:39 PM IST

ताज्या बातम्या