Home /News /national /

खळबळजनक, 2 दिवसांच्या बाळाची हत्या करत शिव मंदिरात फेकलं; शरीरावर गंभीर जखमा

खळबळजनक, 2 दिवसांच्या बाळाची हत्या करत शिव मंदिरात फेकलं; शरीरावर गंभीर जखमा

गेल्या 15 दिवसांत तीन वेगवेगळ्या घटना समोर आल्या असून त्यामध्ये आईनेच आपल्या बाळाचा जीव घेतला आहे.

    भोपाळ, 30 सप्टेंबर : एखाद्या आईसाठी आपलं मुलं हे काळजाचा तुकडा असतं. मात्र मध्य प्रदेशाताली राजधानी भोपाळमध्ये क्रुरतेचा कळस झाला आहे. गेल्या 15 दिवसांत तीन वेगवेगळ्या घटना समोर आल्या असून त्यामध्ये आईनेच आपल्या बाळाचा जीव घेतला आहे. ताजी घटना अयोध्या नगरची आहे, येथील एका शिव मंदिरात 2 दिवसांच्या बाळाचा मृतदेह सापडला आहे. भोपाळच्या अयोध्या नगर परिसरातील पोलिसांना माहिती मिळाली की, एका दोन दिवसांच्या बाळाचा मृतदेह इथल्या शिवमंदिर आवारात सापडला आहे. पोलीस त्वरित घटनास्थळ दाखल झाले तेव्हा त्यांनी बाळाला कपड्यात गुंडाळले. तपास केला असता बाळाच्या शरीरावर खोल जखमा झाल्या आणि कुत्र्यांनी लचके तोडले होते. याप्रकरणी पोलिसांनी अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. वाचा-अहमदनगरमध्ये 26 वर्षीय तरुणीवर बलात्कार, पोलीस निरीक्षकाविरोधात गुन्हा दाखल भोपाळमधील खासगी रुग्णालयात आणि शासकीय रुग्णालयात महिलांच्या प्रसूतीची माहिती गोळा करून पोलीस आरोपींकडे पोहोचण्याचा प्रयत्न करीत आहेत. तसेच आजूबाजूच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणीही केली जात आहे. तसेच निरपराध बाळाला मारणाऱ्या शोधण्यासाठी पोलिसांनी माहिती देणारी यंत्रणा देखील सक्रिय केली आहे. वाचा-पोलीस अधिकाऱ्याने आधी प्रेयसीवर झाडली गोळी, नंतर सासऱ्याची केली हत्या पाणीच्या टाकीत बुडवून बाळाची हत्या याआधी याच भागात 17 सप्टेंबर रोजी खळबळजनक घटना घडली होती. आरोपी आईने आपल्या एका महिन्याच्या मुलीला पाण्याच्या टाकीमध्ये बुडवून ठार केले. या प्रकरणात आरोपी आईने पोलीस व कुटुंबाची दिशाभूल करण्याचा खूप प्रयत्न केला. मात्र पुराव्यांच्या आधारे पोलिसांनी आरोपी आईविरूद्ध कठोर कारवाई केली असता तिने मुलगा न झाल्याने 1 महिन्यांच्या मुलीची हत्या केल्याची कबुली दिली. पोलिसांनी आरोपी आईला अटक केली आणि तुरुंगात पाठविले. वाचा-उपराजधानी हादरली! नागपुरात प्रियकरासमोरच अल्पवयीन मुलीवर तिघांकडून गॅंगरेप 9 महिन्यांच्या बाळाला तळ्यात फेकले दुसरी घटना 18 सप्टेंबर रोजी घडली. भोपाळच्या एका मोठ्या तलावामध्ये प्रियकरासह आरोपी आईने आपल्या 9 महिन्यांच्या मुलीला तळ्यात फेकले. पाण्यात बुडून या 9 महिन्यांच्या बाळाचा मृत्यू झाला. पोलिसांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या आधारे या प्रकरणातील आरोपीची ओळख पटवली आणि या प्रकरणात तिच्या प्रियकरासह आईला अटक केली.
    Published by:Priyanka Gawde
    First published:

    पुढील बातम्या