तरुणाच्या हत्येनंतर गावकऱ्यांनी सेक्स वर्कर महिलेची काढली नग्नधिंड

तरुणाच्या हत्येनंतर गावकऱ्यांनी सेक्स वर्कर महिलेची काढली नग्नधिंड

या जमावाने तरुणाच्या हत्येतील आरोपात रेड लाईट एरियातील एका महिलेला बेदम मारहाण केली.

  • Share this:

बिहार, 21 आॅगस्ट : भोजपूर जिल्ह्यातील एका तरुणाच्या हत्येनंतर एका संशयित महिलेची नग्न धिंड काढल्याची संतापजनक घटना घडलीये. पोलिसांनी या प्रकरणी कारवाई करत राजद नेते कौशल किशोर यादवसह सहा जणांना अटक केलीये.या सर्वांना बिहियांतील जमुआ गावातून अटक केलीये.

सोमवारी रेल्वे ट्रॅकजवळ एका तरुणाचा मृतदेह आढळून आला होता. तरुणाचा मृतदेह आढळून आल्यानंतर गावकऱ्यांनी तीव्र संताप व्यक्त करत तोडफोड आणि जाळपोळ केली होती. जमावाने शहरातील काही दुकानं आणि वाहनं पेटवून दिली होती.

या जमावाने तरुणाच्या हत्येतील आरोपात रेड लाईट एरियातील एका महिलेला बेदम मारहाण केली. हा जमाव एवढ्यावर थांबला नाही त्यांनी या महिलेची नग्नधिंडही काढली. ही घटना बिहियांना पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडली. तिथे या तरुणाचा मृतदेह सापडला होता. मृत तरुणाची ओळख पटली असून विमलेश साव असं नाव आहे.

मृत विमलेश यादव  हा दामोदपूर येथील राहणार आहे. त्याने 11 वीला प्रवेश घेण्यासाठी बिहिया इथं आला होता. ज्या जागेवर त्याचा मृतदेह सापडला त्या ठिकाणाहून रेड लाईट एरिया जवळच होता. तसंच विमलेशच्या वडिलांनी आरोप केलाय की, विमलेशच्या गुप्तांगावर जखमा होत्या.

त्यानंतर याच संशयाच्या आधारावर स्थानिक गावकऱ्यांनी जिथे विमलेशचा मृतदेह सापडला तिथून जवळच एका महिलेचं घर होतं. या महिलेवर संशय बळावला आणि त्यातूनच जमावाने या महिलेला नग्न करून भर रस्त्यावर अमानुष मारहाण केली. पीडित महिला आपण निर्दोष असून मला मारू नका अशी गयावया करत होती पण तरी जमावाने या महिलेला मारहाण केली. अखेर पोलिसांनी हस्तक्षेप करून या महिलेची सुटका केली.

स्थानिक गावकऱ्यांचा आरोप आहे की, विमलेशची हत्या करून त्याचा मृतदेह जाणूनबुजून रेल्वे ट्रॅकच्या शेजारी फेकला. तर दुसरीकडे विमलेश हा परिक्षा देण्यासाठी आला होता. त्याचा दोन अज्ञात तरुणांनी खून करून मृतदेह रेल्वे ट्रॅकवर जवळ फेकून दिला असा आरोप विमलेशच्या कुटुंबाने केलाय.

VIDEO : पाण्याची टाकी पाडणे बेतले जीवावर,'पोकलेन'वर कोसळली टाकी

First published: August 21, 2018, 4:07 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading