Home /News /national /

भंडाऱ्यावरुन परतताना 10 जणांसह उलटली बोट, 8 जण सुरक्षित, दोन मुलं बेपत्ता; घटनेचा Live Video

भंडाऱ्यावरुन परतताना 10 जणांसह उलटली बोट, 8 जण सुरक्षित, दोन मुलं बेपत्ता; घटनेचा Live Video

भिंड जिल्ह्यात असलेल्या सिंध नदीत (Boat Drowned in Sindh River) हिलगाव गावातील गावकऱ्यांनी भरलेली बोट बुडाली आहे. शुक्रवारी संध्याकाळी ही दुर्घटना घडली.

    भिंड, 29 जानेवारी: मध्य प्रदेशातल्या (MP News ) सिंध नदीत मोठी दुर्घटना घडली आहे. भिंड जिल्ह्यात असलेल्या सिंध नदीत (Boat Drowned in Sindh River) हिलगाव गावातील गावकऱ्यांनी भरलेली बोट बुडाली आहे. शुक्रवारी संध्याकाळी ही दुर्घटना घडली. ही दुर्घटना घडली तेव्हा बोटीत जवळपास 10 जण होते. या दुर्घटनेनंतर गावकऱ्यांनी आठ जणांची सुखरुप सुटका केली आहे मात्र दोन मुले अजूनही बेपत्ता आहेत. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांसह प्रशासन, होमगार्ड आणि एसडीआरएफचे पथकही घटनास्थळी पोहोचले. सध्या शोध मोहीम सुरू आहे. बोट बुडाल्याचा लाइव्ह व्हिडिओही समोर (Live Video of Boat Drowning) आला आहे. U19 वर्ल्ड कपवर कोरोना अटॅक! 2 मॅच रद्द, एकाच टीमचे 9 खेळाडू पॉझिटिव्ह  भिंडमधील नयागाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील तेहंगूर येथे ही घटना घडली. हिलगाव गावातील काही लोक बोटीने सिंध नदी पार करून भंडाऱ्याचं जेवण जेवण्यासाठी तेहंगूरला आले होते. परत येताना सिंध नदीत त्यांची बोट उलटली. अपघाताच्या वेळी बोटीत 10 जण असल्याची माहिती मिळाली आहे. यापैकी आठ जणांची गावकऱ्यांनी सुखरूप सुटका केली. याला अतिरिक्त पोलीस अधीक्षक कमलेश खुरपुसे यांनी दुजोरा दिला आहे. दुर्घटनेचा Live Video बोट बुडाल्याचा लाईव्ह व्हिडिओ समोर आला आहे. यामध्ये बोट बुडाल्यानंतर पाण्यात पडलेल्या लोकांच्या किंकाळ्या ऐकू येत आहेत. हे पाहून घटनास्थळी उपस्थित अनेक ग्रामस्थांनी नदीत उड्या घेऊन आठ जणांना वाचवलं. दोन मुलं बेपत्ता या घटनेत बोटीतील दोन मुले अद्याप बेपत्ता असल्याची माहिती अतिरिक्त एसपी यांनी दिली. त्यापैकी एक मुलगा 16 वर्षांचा तर दुसरा मुलगा 13 वर्षांचा आहे. घटनेची माहिती पोलिसांना दिल्यानंतर नयागाव पोलीस ठाण्याचे पथक आणि रौण पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यामुळे नदीत दोन्ही मुलांचा शोध सुरू करण्यात आला. एसडीएमसह अतिरिक्त एसपी आणि इतर अधिकारीही घटनास्थळी पोहोचले. होमगार्ड आणि एसडीआरएफच्या पथकांनाही पाचारण करण्यात आले आहे.
    Published by:Pooja Vichare
    First published:

    Tags: Madhya pradesh

    पुढील बातम्या