भीमा कोरेगाव : सरन्यायाधीशांनंतर तिसऱ्या न्यायाधीशांचाही सुनावणीला नकार

भीमा कोरेगाव : सरन्यायाधीशांनंतर तिसऱ्या न्यायाधीशांचाही सुनावणीला नकार

भीमा कोरेगाव प्रकरणी उच्च न्यायालयाने याचिका फेटाळल्यानंतर गौतम नवलखा यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 03 ऑक्टोंबर : भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणी गौतम नवलखाच्या याचिकेवर सुनावणी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीस एस रविंद्र भट्ट यांनी नकार दिला आहे. भीमा कोरेगाव प्रकरणात नवलखाला आरोपी करण्यात आलं आहे. त्याच्यावर दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यांना रद्द करण्यासाठी न्यायालयात याचिका दाखल केली आहे. चार ऑक्टोंबरला या प्रकरणी पुढील सुनावणी होईल असं न्यायालयाने म्हटलं आहे.

सर्वात आधी सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी नवलखा यांच्या याचिकेवर सुनावणी करण्यास नकार दिला होता. त्यानंतर मंगळवारी त्यांची याचिका न्यायाधीश एन. व्ही. रमण, न्यायाधीश बी. आऱ. सुभाष आणि न्यायाधीश बी. आर. गवई यांच्या घटनापीठासमोर आली होती. मात्र न्यायाधीश गवई सुनावणीतून स्वत: बाजूला झाले. पुन्हा याचिका न्यायाधीश एस रविंद्र भट्ट यांच्यासमोर आली. त्यावर त्यांनीही सुनावणीला नकार दिला.

भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणी गौतम नवलखाने मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. उच्च न्यायालयानं त्याच्याविरुद्धचा गुन्हा रद्द करण्यास नकार दिला होता.

मुंबई उच्च न्यायालयाने नवलखावर दाखल करण्यात आलेला गुन्हा रद्द करण्याचे अपील 13 सप्टेंबरला फेटाळून लावलं होतं. त्यावेळी न्यायालयाने म्हटलं होतं की, प्रकरणात सत्य दिसत आहे. यामध्ये अजून सखोल चौकशी आणि तपासाची गरज आहे.

31 डिसेंबर 20174 मध्ये यल्गार परिषदेचं आयोजन भीमा कोरेगावमध्ये करण्यात आलं होतं. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी हिंसाचार सुरू झाला होता. या प्रकरणी गौतम नवलखाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. तसेच नक्षलवाद्यांसी संपर्क ठेवल्याचा आरोपही त्याच्यावर करण्यात आला होता.

VIDEO : चंद्रकांत पाटलांचा मार्ग मोकळा; कोथरूडमधील दुसरे बंड ही शांत!

Published by: Suraj Yadav
First published: October 3, 2019, 12:39 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading