हैदराबाद,26 जानेवारी: भीम आर्मी चीफ चंद्रशेखर आझाद (Chandrashekar Azad) यांना हैदराबाद पोलिसांनी (Hyderabad Police) ताब्यात घेतले आहे. लंगर हाऊस पोलिस स्टेशनच्या हद्दीत CAA-NRC च्या विरोधी आंदोलनात चंद्रशेखर आझाद सहभागी झाले होते. पोलिसांनी सांगितले की, या आंदोलनाची परवानगी नाकारण्यात आली होती. तरी देखील भीम आर्मीच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यांवर उतरून CAA-NRC ला विरोध केला. दरम्यान, चंद्रशेखर आझाद यांना गेल्या वर्षी 20 डिसेंबरला दरियागंज भागात पोलिसांनी ताब्यात घेतले होते. दरियागंज भागात बेकायदा आंदोलन केल्याप्रकरणी चंद्रशेखर आझाद यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.
CAA-NPR-NRCबाबत दिशाभूल...
समाजवादी नेता कर्पूरी ठाकूर यांच्या जयंतीनिमित्त त्यांना आदरांजली देताना शुक्रवारी चंद्रशेखर आझाद यांनी मोदी सरकारवर घणाघाती आरोप केला होता. CAA, NPR आणि NRCबाबत भाजप सरकार खोटी माहिती पसरवून देशातील जनतेची दिशाभूल करत आहे.
Hyderabad Police: Chandrashekar Azad has been detained ahead of his participation in a protest against CAA and NRC under Lungerhouse police station limits. The protesters didn’t have any police permission for the protest. https://t.co/LNdzJ6WQME pic.twitter.com/7IMtgFVoBG
— ANI (@ANI) January 26, 2020
एका सभेला संबोधित करताना चंद्रशेखर आझाद यांनी आंदोलकांनी संयम राखण्याचे आवाहन केले होते. दिल्लीतील शाहीन बागमध्ये (Shaheen Bagh) महिलांनी केलेल्या आंदोलनापासून आपण प्रेरणा घ्यायला हवी, असेही आझाद यावेळी म्हणाले होते.
आझाद यांनी भाजप सरकारवर निशाणा साधत देशाची एकता आणि अखंडतेला धक्का पोहोचवल्याचा आरोप केला होता. आझाद यांनी सांगितले की, ही लढाई एकट्याची नाही, तर भीम आर्मी (Bheem Army) त्यांच्यासोबत आहे.