भिलवाडा 4 जून: आंदोलन करताना लक्ष वेधून घेण्यासाठी कार्यकर्ते काय करतील याचा काहीच नेम नसतो. राजस्थानमधल्या भिलवाडा इथं बीज बिलांसाठी आंदोलन करताना अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी एका प्लेटमध्ये आपलं रक्त काढलं आणि ते अधिकाऱ्यांच्या हातात देत त्यांना प्यायला सांगितलं. या आंदोनाने अधिकारी हादरुन गेले आहेत.
लॉकडाऊनमुळे मार्च महिन्यांपासून सगळी दुकानं जवळपास दोन महिने बंदच होती. राजस्थानातलं भिलवाडाही बंदच होतं. मात्र जून महिन्यात दुकानदारांना जी बीलं आलीत ती बीलं आधीच्या महिन्यांची सरासरी काढून देण्यात आली होती.
हे काम एका खासगी कंपनीला देण्यात आलं होतं. दोन महिने दुकानच बंद असल्याने वीजेचं बील हे किमान यायला पाहिजे होतं. मात्र जास्तीची बीलं आल्याने दुकानदार हैराण झालेत.
दोन महिले धंदाच नाही आणि वीज बिल मात्र जादा आकारण्यात आल्याचा त्यांचा युक्तिवाद होता. या दुकानदारांसाठी एबीव्हीपीने आंदोलन छेडले होते.
त्या गर्भवती हत्तीणीला मारणाऱ्या नराधमांचा शोध सुरू; देशभरातून वाढला दबाव
त्या कंपनीच्या कार्यालयासमोर जाऊन त्यांनी निदर्शने केलीत आणि आपलं रक्तच प्लेटमध्ये काढून ते अधिकाऱ्यांना दिलं. जनतेचं तुम्हाला रक्तच प्यायचं असेल तर हे घ्या असं म्हणत त्यांनी घोषणाबाजी केली.
त्यानंतर हादरलेल्या अधिकाऱ्यांनी पोलिसांना बोलावलं. पोलिसांनी आंदोलकांची समजूत काढत त्यांना परत पाठवलं. तर वीज कंपनीच्या अधिकाऱ्यांनी तोडगा काढण्याचं आश्वासन दिलं.
हे वाचा -
राज्यातल्या ग्रामपंचायत निवडणुकांबद्दल मोठा निर्णय; मंत्र्यांनी दिली माहिती
देवेंद्र फडणवीसांचा आतापर्यंतचा सर्वात गंभीर आरोप, उद्धव ठाकरेंना लिहिले पत्र
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.