पहिले प्रेमाच्या जाळ्यात अडकवलं, नंतर लग्न आणि मग केली हत्या

मुलीच्या कुटुंबीयांनी मुलाच्या नातेवाईकांशी संपर्क साधला तेव्हा मुलीचा मृत्यू झाला असून अंत्यसंस्कारही झाल्याचं त्यांनी सांगितलं.

News18 Lokmat | Updated On: Jul 20, 2019 07:29 PM IST

पहिले प्रेमाच्या जाळ्यात अडकवलं, नंतर लग्न आणि मग केली हत्या

नवी दिल्ली 20 जुलै : प्रेमासाठी वाट्टेल ते करण्याची तयारी असल्याच्या घटना कायम पुढे येत असतात. कुटुंबाचा विरोध पत्करत, समाजाने बहिष्कार घातल्यावरही प्रेम विवाह करून वेगळं जग उभारण्याच्या घटनाही काही कमी नाहीत. मात्र बिहारच्या एक युवकाने या सगळ्यांनाच काळीमा फासलीय. पहिल्यांदा त्याने एका युवतीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवलं. नंतर आणा भाका घेत तिच्याशी लग्न केलं आणि नंतर तिला दिल्लीत नेत महिनाभरातच तीची हत्या केल्याची खळबळजनक घटना घडलीय.

खळबळजनक : चोरांचा 'पाण्या'वरच दरोडा, असं पळवलं 20 हजार लिटर पाणी

बिहारच्या शेखपूरा भागातली ही घटना आहे. इथे राहणाऱ्या एका युवकाचं तिथल्याच एका युवतीवर प्रेम होतं. सुरुवातीला त्याने तिची ओळख करून घेतली, नंतर तिच्याशी प्रेमाचं नाटक केलं. कुटुंबीयांनी सुरुवातीला या लग्नाला विरोध केला होता. मात्र दोघांचं प्रेम पाहून शेवटी घरच्यांनी परवानगी दिली.

या दोघांचं जून महिन्यात लग्न झालं. युवक हा दिल्लीत एका खासगी कंपनीत नोकरी करत असल्याचं त्याने संगितलं होतं. लग्नानंतर तो काही दिवसांमध्येच दिल्लीत गेला आणि नंतर तो पत्नीलाही दिल्लीला घेऊन आला. महिनाभरानंतर ख्याली खुशाली विचारण्यासाठी मुलीच्या आईने जेव्हा मुलीशी बोलण्याचा प्रयत्न केला तेव्हा तीचा फोन लागत नव्हता.

शीला दीक्षित यांची 'दिल्लीवाली'प्रेमकहाणी, बसमध्ये केलं प्रपोज

Loading...

त्यामुळे त्यांनी जावयाला फोन केला तेव्हा तो उडवाउडवीची उत्तर देत होता. सगळं व्यवस्थित आहे असं तो सांगायचा मात्र मुलीशी काही बोलणं होत नव्हतं. शेवटी मुलीच्या कुटुंबीयांनी  मुलाच्या नातेवाईकांशी संपर्क साधला तेव्हा मुलीचा मृत्यू झाला असून अंत्यसंस्कारही झाल्याचं त्यांनी सांगितलं. हे ऐकून मुलीच्या कुटुंबीयांना धक्काच बसला.

शेवटी मुलीच्या कुटुंबीयांनी पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली. आता पोलीस चौकशी करत असून त्यांनी त्या युवकाला ताब्यात घेतलंय. नेमकं काय झालं याचं मात्र अजुनही गुढच आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Jul 20, 2019 07:29 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...