भय्यूजी महाराजांची सुसाईड नोट सापडली, मृत्यूचं गूढ कायम

भय्यूजी महाराजांची सुसाईड नोट सापडली, मृत्यूचं गूढ कायम

भय्यूजी महाराजांची सुसाईड नोट मिळाली असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. मात्र त्या नोटमध्ये काय आहे याची माहिती मात्र पोलिसांनी दिली नाही. गेल्या काही दिवसांपासून ते तणावात होते अशीही माहिती आहे.

  • Share this:

इंदूर,ता.12 जून : भय्यूजी महाराजांची सुसाईड नोट मिळाली असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. मात्र त्या नोटमध्ये काय आहे याची माहिती मात्र पोलिसांनी दिली नाही. गेल्या काही दिवसांपासून ते तणावात होते अशीही माहिती आहे.

त्याचबरोबर त्यांच्या सामाजिक कार्याचा व्याप प्रचंड वाढल्याने त्यांच्यावर मोठं कर्ज झालं होतं अशीही माहिती आहे. हा सर्व डोलारा सांभाळणं त्यांना अवघड गेलं. त्यामुळं ते अस्वस्थ होते अशी माहिती आहे. मात्र त्यांच्या आत्महत्येचं नेमकं कारण काय हे मात्र अजुनही गुढ आहे.

पोलिस या प्रकरणाची चौकशी करणार आहे. त्यानंतरच खरी माहिती बाहेर येणार आहे.आज सकाळी त्यांनी त्यांच्या राहत्या घरीच डोक्यात गोळी झाडली. त्यानंतर त्यांना इंदूरच्या बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. मात्र उपचारादरम्यानच त्यांचा मृत्यू झाला. ते 50 वर्षांचे होते.

गेल्या काही दिवसांपासून ते निराशेच्या अवस्थेत होते अशीही माहिती आहे. त्या निराशेतूनच त्यांनी आत्महत्या केली असावी असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. काही दिवसांपूर्वीच मध्यप्रदेश सरकारनं राज्यातल्या विविध संत मंडळींना मंत्रीपदाचा दर्जा दिला होता त्यात भय्यूजी महाराज यांचाही समावेश होता.

मॉडेलिंग ते आध्यात्मिक गुरू असा त्यांचा चढता आलेख होता. 1968 मध्ये त्यांचा जन्म झाला होता. सर्वच पक्षांमधल्या राजकारण्यांशी त्यांचे जवळचे संबंध होते. विविध आंदोलनांमध्ये मध्यस्त्याची भूमिकाही त्यांनी निभावली होती.

भय्यूजी महाराजांचा अल्पपरिचय

फोटो गॅलरी : पंतप्रधान मोदी ते सेलिब्रेटींसोबत भय्यूजी महाराज

First published: June 12, 2018, 3:55 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading