तणावमुक्त होण्यासाठी 2 वर्षांपासून पुण्याच्या या रुग्णालयात भय्यूजी महाराज घेत होते उपचार !

तणावमुक्त होण्यासाठी 2 वर्षांपासून पुण्याच्या या रुग्णालयात भय्यूजी महाराज घेत होते उपचार !

भय्यूजी महाराज यांच्या आत्महत्येचं गुढ अद्याप कायम आहे. त्यांच्या आत्महत्येमागचे अनेक खुलासे आता समोर येत आहेत.

  • Share this:

मुंबई, 16 जून : भय्यूजी महाराज यांच्या आत्महत्येचं गुढ अद्याप कायम आहे. त्यांच्या आत्महत्येमागचे अनेक खुलासे आता समोर येत आहेत. मागच्या 2 वर्षांपासून भय्यूजी महाराज मोठ्या तणावात होते अशी माहिती धक्कादायक माहिती आता समोर आली आहे.

पुण्याच्या देवयानी या हॉस्पिटलमध्ये डॉ. श्रीरंग लिमये यांच्याकडून ते तणावमुक्त होण्यासाठी उपचार घेत होते अशी माहिती आता पोलीस तपासात समोर आली आहे.

दरम्यान, भय्यूजी महाराज यांच्या आत्महत्येप्रकरणी पोलिसांनी त्यांच्या कुटुंबीयांच्या चौकशीला सुरूवात केली आहे. भय्यूजी महाराजांच्या पत्नी डॉ. आयुषी, मुलगी कुहू आणि सेवक विनायक यांचा जबाब पोलीस नोंदवून घेणार आहेत.

 

भय्यूजी महाराज अनंतात विलीन, मुलीने दिला अग्नी

भय्यूजी महाराजांनी 'या' पिस्तुलने जीवनयात्रा संपवली

पोलीस अधिकारी मनोज रत्नाकर हे या प्रकरणाची चौकशी करत आहे. रत्नाकर यांच्या नेतृत्वाखाली 7 पोलीसांचं एक पथक आज दुपारी भय्युजी महाराजांच्या निवासस्थानी गेलं आणि त्यांनी चौकशी केली. डॉ. आयुषी या भय्यूजी महाराजांच्या दुसऱ्या पत्नी आहेत. तर कुहू ही त्यांच्या पहिल्या पत्नीपासून झालेली मुलगी आहे.

कुहू आणि डॉ. आयुषी यांचं पटत नव्हतं. त्यांच्यात सतत भांडणं होत होती. त्यामुळं भय्यूजी महाराज अस्वस्थ होते. त्यातच समाजकार्यासाठी पैशाची कमतरता भासत असल्याने त्याचा ताणही त्यांच्यावर होता. याच ताण तणावामुळं त्यांनी आत्महत्या केल्याचा प्रार्थमिक निष्कर्ष काढण्यात येत आहे.

 

कोण आहे विनायक, जो सांभाळणार भय्यूजी महाराज यांची संपूर्ण संपत्ती !

भय्यूजी महाराज यांच्या संपत्तीचे अधिकार 'या' सेवेदाराला ! सुसाईड नोटचा दुसरा भाग नेटवर्क18 च्या हाती

तर विश्वासू सेवक विनायक यांच्या नावावर त्यांनी आपला सर्व आर्थिक व्यवहार आणि आश्रमाची जबाबदारी आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिढ्ढीत दिली होती. गेल्या 15 वर्षांपासून पेक्षा जास्त काळापासून विनायक हा भय्यूजी महाराजांसोबत सावली सारखा वावरत होता त्यामुळं त्याकडेही बरीच माहिती असल्याची चर्चा आहे.

संबंधित बातम्या -

मी धार्मिक राॅबीनहूड...भय्यू महाराजांचा जीवनप्रवास

VIDEO : भय्यूजी महाराजांचा एक दिवसआधीच व्हिडिओ समोर, 'ती' महिला कोण ?

महागड्या गाड्या आणि घड्या, भय्यूजी महाराजांची आलिशान लाईफस्टाईल

राजकारण्यांचे संकटमोचक, भय्यूजी महाराज!

 

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 16, 2018 12:03 PM IST

ताज्या बातम्या