भय्यू महाराज यांची संपत्ती जाहीर,ट्रस्टी म्हणून पत्नीची निवड

भय्यू महाराज यांची संपत्ती जाहीर,ट्रस्टी म्हणून पत्नीची निवड

भय्यू महाराज यांच्या निधनानंतर त्यांच्या श्री सद्गुरू धार्मिक आणि पारमार्थिक ट्रस्टमध्ये पत्नी आयुषी यांना ट्रस्टी करण्यात आलंय

  • Share this:

इंदूर, 14 आॅगस्ट : भय्यू महाराज यांच्या निधनानंतर त्यांच्या श्री सद्गुरू धार्मिक आणि पारमार्थिक ट्रस्टमध्ये पत्नी आयुषी यांना ट्रस्टी करण्यात आलंय. ट्रस्टने आयुषी यांना ट्रस्टी करण्याचा ठराव 28 जून रोजी सर्वसाधारण सभेत मंजूर करण्यात आला होता.  ट्रस्टचे सचिव तुषार पाटील यांनी आयुषी यांचं नाव अधिकृतरित्या ट्रस्टी म्हणून घेण्यासाठी नावनोंदणी करण्यासाठी पाठवलंय.

कोल्हापूरचे दिलीप माधवराव भांडवलकर यांनी प्रकृतीचे कारण देत 22 जून रोजी ट्रस्टीपदावरून राजीनामा दिला. त्यांच्या जागी आयुषी यांची वर्णी लागली. भय्यू महाराज यांचा सेवक विनायक दुधाले यानेच आयुषी यांच्या संचालक होण्याचा प्रस्ताव मांडला. या प्रस्तावाला 8 ट्रस्टींनी मान्यता दिली.

भय्यू महाराज यांची संपत्ती

ट्रस्टने वर्षभराचा आर्थिक अहवालही सादर केला. यात जमीन, वाहन, फर्निचरसह एका-एका वस्तूचा हिशेब देण्यात आलाय. ट्रस्टच्या इंदूर शाखेकडे जवळपास 1 कोटी 46 लाखांची संपत्ती आहे. इतर ठिकाणाचा हिशेब मोजली असता जवळपास दीड कोटी असल्याचं समोर आलंय.

76 एकर जमीन याची किंमत 84.81 लाख दाखवण्यात आलीये. तर ट्रस्टकडे अजून 20 एकरहुन अधिक जमिनी आहे. ही जमीन 76 एकर पेक्षाही जास्त आहे. कागदोपत्री याची किंमत 84 लाख 81 हजार दाखवण्यात आली.

शेती करणाऱ्यासाठी 2001 ते 2010 या काळात जी जमीन ट्रस्टला दान म्हणून मिळाली होती. फक्त चार ते पाच एकर जमीन 2010 मध्ये दानमध्ये मिळाली तर काही जमीन ही खरेदी करण्यात आली होती. त्यामुळे त्यावेळची जमिनीची किंमत ही कागदोपत्री दाखवण्यात आलीये. आता या जमिनीची किंमत कोट्यवधींच्या घरात आहे.

अनेक वाहनंही ट्रस्टच्या नावावर आहे. यात अॅम्बलुन्स, बोलेरो कार, बस, इनोव्हा कार, पजेरो, स्पोर्ट कार, स्कूल बस, मेक्सिमो माईन कार, टाटा मॅजिक आणि दुचाकींचा समावेश आहे. तसंच ट्रस्टमध्ये आश्रममध्ये एसी, सीसीटीव्ही,एलईडी, मोबाईल आणि अन्य फोन असल्याची माहितीही दिलीये.

विशेष म्हणजे, भय्यू महाराज यांनी आत्महत्येपूर्वी सुसाईड नोट लिहिली होती. या सुसाईड नोटमध्ये आपली संपत्तीचा व्यवहार हा सेवक विनायक सांभाळेल असं लिहिलं होतं. भय्यू महाराज यांच्या संपत्तीवर बराच वाद निर्माण झाला होता. अखेर पत्नी आयुषी यांची ट्रस्टपदी निवड झाल्यामुळे सर्व वादांवर पडदा पडलाय.

संबंधित बातम्या -

अाध्यात्मिक गुरू भय्यूजी महाराज यांची आत्महत्या

मॉडलिंग ते संत...भय्यूजी महाराजांचा प्रवास

दोन लग्न...भय्यूजी महाराजांचं वैवाहिक आयुष्य !

राजकारण्यांचे संकटमोचक, भय्यूजी महाराज!

'मृत्युंजय महादेवा,तुला शरण आलो', भय्यूजी महाराजांचं शेवटचं 

जिथे सप्तपदी घेतली, तिथेच आयुष्य संपवून टाकलं!

हे आहेत भय्यूजी महाराजांचे शेवटचे शब्द, आता कुटुंबाची जबाबदारी घ्या!

भय्यूजी महाराजांची चटका लावणारी एक्झिट - मान्यवरांच्या प्रतिक्रिया

VIDEO : गुजरातमध्ये महाराष्ट्रीयन दोन महिलांची तुफान मारामारी

First published: August 14, 2018, 2:34 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading