• Home
 • »
 • News
 • »
 • national
 • »
 • भय्यू महाराजांच्या पत्नी झाल्या भावुक; सासुच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करताना म्हणाल्या...

भय्यू महाराजांच्या पत्नी झाल्या भावुक; सासुच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करताना म्हणाल्या...

भय्यू महाराज यांच्या द्वितीय पत्नी आयुषी यांनी कुमुदिनी देशमुख यांच्यावर अंत्यसंस्कार केले. यावेळी आयुषी या भावुक झाल्या होत्या.

 • Share this:
  मध्य प्रदेश, 9 मे : भय्यू महाराज यांच्या मातोश्री आणि विश्वासराव देशमुख बापू यांच्या पत्नी कुमुदिनी देशमुख उर्फ बाईसाहेब यांचं निधन झाल्याचं वृत्त समोर आलं आहे. भय्यू महाराज यांच्या द्वितीय पत्नी आयुषी यांनी कुमुदिनी देशमुख यांच्यावर अंत्यसंस्कार केले. यावेळी आयुषी या भावुक झाल्या होत्या. त्यांनी ट्वीटवर आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. त्यांनी आपल्या ट्वीटमध्ये लिहिलं आहे की, तुमच्यावर अंत्यसंस्कार करताना माझे हात थरथरत होते. तुम्ही या जगात नाही, ही बाब मन मानायला तयारच नाही, असं त्यांनी आपल्या सोशल मीडियावर लिहिलं आहे. भय्यू महाराज यांनी 12 जूनला त्यांनी आत्महत्या केली आणि सगळीकडे एकच खळबळ उडाली होती. तणावाखाली येऊन आत्महत्या केली असं त्यांनी सुसाईट नोटमध्ये लिहिलं होतं. भय्यू महाराजांचे मध्य प्रदेशाबरोबर महाराष्ट्रातही अनेक भक्त होते, चाहते होते. त्यांना भय्यू महाराजांच्या अचानक मृत्यूमुळे फार मोठा धक्का बसला. पण त्यानंतरचे धक्के बसले या आत्महत्या प्रकरणाला वर्षभरात मिळालेल्या कलाटणीमुळे. या घटनेला वर्षभरात वेळोवेळी धक्कादायक वळणं मिळाली आणि शेवटी त्यांच्या जवळची काही माणसंच त्यांना कशी ब्लॅकमेक करत होती हे उघड झालं. आपली बदनामी केली जाईल अशी भीती भय्यू महाराजांना होती, आपल्या प्रतिमेला तडा जावू नये म्हणून त्यांनी आत्महत्या केली, हे उघड झालं. भय्यू महाराज आत्महत्येला वेगळं वळण मिळालं ते एका तरुणीमुळे. पलक नावाच्या या तरुणीचे भय्यू महाराजांशी काय संबंध होते आणि तिचा या आत्महत्येशी काही संबंध आहे का याचा तपास करण्यासाठी पोलिसांनी 125 जणांची चौकशी केली. 25 जणांचे जबाब नोंदवला. हे ही वाचा-#MaaKiKhushiKeLiye मातृदिनानिमित्त मातांच्या चेहऱ्यावर हास्य खुलवणार HDFC Bank भय्यू महाराजांची पहिली पत्नी माधवी यांच्या निधनानंतर पलक केअर टेकर म्हणून आली होती. महाराजांच्या एकटेपणाचा फायदा घेत तिने प्रेम संबंध निर्माण केले. तिनेच महाराजांचा अश्लील व्हिडिओ तयार केला. इतक नव्हे तर वॉट्सएपवर अश्लील चॅटकरुन ते सेव्ह करायची. यात महाराजांनी 17 एप्रिल 2017 रोजी आयुषी यांच्याशी विवाह केला. याची माहिती कळताच पलकने लग्नासाठी दबाव टाकण्यास सुरुवात केली. महाराजांनी लग्नासाठी नकार दिला. त्यावर, मी तुम्हाला लग्न करण्यासाठी एक वर्षाचा मुदत देते अशी धमकी तिने दिली होती.
  Published by:Meenal Gangurde
  First published: